Asaram Bapu Bail : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन; सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब

Supreme Court Decision Interim Bail Rape Case : आसाराम बापू यांना मागील वर्षीही ऑगस्ट महिन्यांत सात दिवसांचा जामीन मिळाला होता.
Asaram Bapu
Asaram BapuSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांना 31 मार्चपर्यंत जामीन देण्यात आला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भक्तांना न भेटण्याची ताकीदही कोर्टाने दिली आहे.

दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूवर 2013 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने सहा आरोपींना निर्दोष ठरवत आसाराम बापूंना दोषी ठरवले. या प्रकरणात 2018 मध्ये जोधपूर कोर्टाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Asaram Bapu
Bharatpol : फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘भारतपोल’; अमित शहांचा मास्टरस्ट्रोक

मागील वर्षीही ऑगस्ट महिन्यांत आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांचा जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्याची रवानगी पुन्हा जेलमध्ये करण्यात आली होती.

मागील वर्षी जोधपूरच्या एम्स रुग्णालयात श्वसन आणि इतर गंभीर समस्यांमुळे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडून आयुर्वेदिक उपचाराचा मुद्दा जामीन अर्जात नमूद करण्यात आला होता.न्यायालयाने तो ग्राह्य धरत आसाराम बापूंना जामीन अर्ज दिला होता.

Asaram Bapu
Sheikh Hasina: शेख हसीना यांचा पाय आणखी खोलात; ICTने उचललं मोठं पाऊलं

आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाने पुन्हा वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन दिला आहे. त्याला 31 मार्चपर्यंत उपचार तुरुंगाबाहेर येऊन उपचार घेता येणार आहेत. मात्र, या काळात भक्तांना भेटता येणार नाही, अशी अटक कोर्टाने घातली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com