BJP Politics : दिल्लीत भाजपला झटका; 4 महिन्यांपूर्वीच प्रवेश झालेल्या नगरसेविकेचे विरोधात मतदान, लगेच हकालपट्टी

Background: Who Is Suman Tinku Rajora? : नुकत्याच झालेल्या वॉर्ड समितीच्या निवडणुकीत पक्षाच्याच नगरसेविकेने विरोधात मतदान केल्याचे समोर आले आहे.
BJP Pune
BJP PuneSarkarnama
Published on
Updated on

Delhi BJP : दिल्ली महापालिकेत भाजपला मोठा झटका बसला आहे. मागील काही महिन्यांत आम आदमी पक्षातील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचा मोठा फायदाही भाजपला झाला. मात्र, एका नगरसेविकेमुळे भाजपला दिल्ली महापालिकेतील वार्ड समितीच्या निवडणुकीत फटका बसल्याचेही समोर आले आहे.

नुकत्याच झालेल्या वॉर्ड समितीच्या निवडणुकीत पक्षाच्याच नगरसेविकेने विरोधात मतदान केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या नगरसेविकेने चार महिन्यांपूर्वीच आम आदमी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने या नगरसेविकेची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. सुमन टिंकू राजौरा असे या नगरसेविकेचे नाव आहे.

दिल्ली भाजपने याबाबत राजौरा यांना पत्र पाठवून पक्षातून निलंबित केल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले की, दिल्ली पालिकेच्या रोहिणी वॉर्डमध्ये तुम्ही पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले आहे. सर्व नगरसेवकांसोबत वैयक्तिक चर्चा केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. तुम्हीही ते स्वीकारले आहे. तुम्ही पक्षाच्या आदेशाचा अपमान केला आहे.

BJP Pune
IPS अधिकाऱ्याच्या राजीनाम्यावरून राजकीय वादळ; माजी मुख्यमंत्री भडकले...

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या निर्देशानुसार आणि पक्षाच्या संविधानानुसार तुमची प्राथमिक सदस्यता तातडीने समाप्त केली जात आहे. तसेच तुम्हाला भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले जात असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

BJP Pune
Russia vs Ukraine : रशियाने घेतला बदला; यूक्रेनसाठी ठरली 3 वर्षांतील सर्वात भयावह रात्र...

नेमकं काय घडलं?

दिल्लीत नुकत्याच वार्ड स्तरीय समित्यांसाठी निवडणूक झाली. अनेक ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळाले. मात्र, रोहिणी वॉर्ड समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले. याच वॉर्डमध्ये सुमन टिंकू राजौरा यांचेही मतदान होते. पण त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याने पराभव झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com