
Ukraine’s Response and Defense Efforts : मागीत तीन वर्षे रशिया आणि यूक्रेनमध्ये संघर्ष सुरू असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी यूक्रेनने ड्रोनद्वारे रशियाच्या लढाऊ विमानांना टार्गेट केले होते. तसेच एक प्रसिध्द पूलालाही हादरा दिला होता. एकप्रकारे रशियाला यूक्रेनने आव्हानच दिले होते. आता रशियानेही त्याचा बदला घेतला आहे.
रशियाने यूक्रेनवर तब्बल 479 ड्रोन आणि 20 मिसाईल डागल्याचे समोर आले आहे. यूक्रेनसाठी सोमवारची रात्र मागील तीन वर्षांतील सर्वाधिक भयावह रात्र ठरली. त्यानंतर यूक्रेनच्या हवाई दलाचे दावा केला आहे की, देशातील मध्य आणि पश्चिम भागाला रशियाने टार्गेट केले होते. रशियाने केलेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
रशियाचे 277 ड्रोन आणि 19 मिसाईल हवेतच नेस्तनाबूत केल्याचा दावाही यूक्रेन हवाई दलाने केला आहे. रशियाच्या केवळ 10 ड्रोन आणि मिसाईलला लक्ष्य साधता आले. या हल्ल्यात केवळ एक व्यक्ती जखमी झाल्याचा दावाही यूक्रेनने केला आहे. मात्र, या दाव्याबाबत कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रशियाच्या हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले, याची माहिती समोर येऊ शकली नाही.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात यूक्रेनमध्ये स्थिती अधिक गंभीर होत चालल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रपती झेलेंस्की यांनी सांगितले की. पूर्व आणि उत्तर-पूर्व भागातील स्थिती खराब बनली आहे. यूक्रेनला एअर डिफेन्स सिस्टीमची गरज आहे. त्यासाठी झेलेंस्की यांनी पश्चिमेकडील देशांना आवाहन केले आहे. मात्र, अमेरिकेच्या भूमिकेबाबत अनिश्चितता असल्याने झेलेंस्की यांची अडचणी वाढल्या आहेत.
दुसरी रशियाच्या सैन्याने यूक्रेनचे मिसाईल आणि ड्रोनचा हल्ला परतवून लावल्याचा दावा केला आहे. यूक्रेनची 49 ड्रोन हवेतच नष्ट केल्याचे रशियाने म्हटले आहे. ड्रोन हल्ल्यात वोरोनिश भागात गॅसच्या एका पाइपलाईनचे नुकसान झाले. तिथे आगही लागली होती, असेही रशियाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.