

Delhi BJP Video Viral News : दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांच्यामुळे वाद निर्माण झाला आहे. येथे निकृष्ट दर्जाच्या रस्ते आणि भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारणाऱ्या एका तरूणावर वर्मा यांनी हात सोडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेवरून आपने भाजप आणि मंत्री प्रवेश वर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील टीका करत निशाना साधला आहे. त्यांनी, 'एक्स'वर या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आपण सोमवारी घटनास्थळी भेट देणार असून मंत्री वर्मा यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.
दिल्ली सरकारमधील भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पश्चिम दिल्लीतील टिळक नगर येथील रस्त्यांच्या पाहणीसाठी बोलावले होते. याचवेळी ही घटना घडली. यावेळी त्यांच्या समोरच एका तरूणाने निकृष्ट दर्जाच्या काम आणि भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारत व्हिडिओ बनवत होता. वर्मा यांनी पोलीस आणि कॅमेरा समोर असतानाही त्या तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकावला. तसेच त्या तरुणाच्या कानशिलात लगावली.
यावरून आता वाद सुरू झाला असून केजरीवाल यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना आपण सोमवारी घटनास्थळी भेट देणार आहे. तर असा प्रकार करणाऱ्या मंत्र्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच वर्मा यांचा भ्रष्टाचार कॅमेऱ्यात उघड झाल्यानेच त्यांनी रेकॉर्डिंग करणाऱ्या मुलाला थप्पड मारलीय? आता तुमचा हा उद्धटपणा टिकणार नाही. आता मी स्वतः भ्रष्टाचाराच्या त्या रस्त्याची पाहणी करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे.
ज्या तरूणाला मारहाण झाली आहे तो आम आदमी पक्षाचे टिळक नगरचे आमदार जरनैल सिंग यांचा वैयक्तिक सहाय्यक साहिब सिंग आहेत. या घटनेनंतर आमदार सिंग यांनी हा व्हिडिओ 'एक्स'वर पोस्ट करत, हे भारताची राजधानी दिल्लीतील भाजप सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. जे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते, पण घोटाळे उघडकीस येत असल्याचे पाहून त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या माझ्या सहकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणावर दिल्ली आपचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, मंत्री प्रवेश वर्मा भित्रे असून त्यांनी अशा पद्धतीने एका तरूणाला मारणे अत्यंत लाजीरवाणे आहे. पोलिसांना समोर करून आधी मारहाण करणे आणि नंतर गाडीत बसून पळून जाणे, हा त्यांचा भित्रेपणा आहे. तो मुलगा दिल्ली सरकारने बनवलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची पोलखोल करणारा व्हिडिओ बनवत होता. आपली पोलीस सुरक्षा आणि रक्षक हटवून बघा, मग समजेल की तुम्ही खरंच किती धाडसी आहात. ताकद असेल तर कोणतीही पोलीस सुरक्षा न घेता या लहान मुलाचा सामना करून दाखवा, असे थेट आव्हानच भारद्वाज यांनी दिले आहे.
दरम्यान आता ज्याला मारहाण झाली आहे त्या तरूणाची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. त्याने, मी स्थानिक आमदारांचा वैयक्तिक सहाय्यक असून त्यांच्या सोशल मीडियाची सर्व कामे सांभाळतो. मला सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी येथे बोलावले होते. त्यावेळी मी फक्त मंत्र्यांना रस्त्याचा निकृष्ट दर्जा दाखवून दिला. तेव्हा मंत्र्यांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतरांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. तर ही घटना पोलीस तिथे उपस्थित असताना घडली.
यामुळे आता मंत्र्यांनी माफी मागावी. तसेच भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. आम्ही कोणतेही आरोप करत नसून तर संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पुरावा म्हणून आमच्याकडे आहे. यामुळे कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही तक्रार दिली असून कायदेशीर लढाईही लढू असा इशारा त्या तरूणाने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.