Delhi BJP Strategy : दिल्लीत राजस्थानप्रमाणे भाजपचे धक्कातंत्र; आणखी दोन वेगळ्या पॅटर्नची चर्चा

Rajasthan BJP Tactics News : 21 राज्यांमध्ये सत्तेत असताना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कुठेही महिला चेहऱ्यावर विश्वास दाखवलेला नाही.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजपने दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर बहुमत मिळवले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी जवळपास 11दिवसाचा कालावधी लागला. भाजपने दिल्लीचं नेतृत्त्व वैश्य समाजातून येणाऱ्या रेखा गुप्ता यांच्याकडे सोपवले आहे. त्या पहिल्या टर्मच्या आमदार आहेत. शालीमार बाग मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. हे करीत असताना भाजपने दिल्लीत राजस्थानप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. दुसरीकडे 21 राज्यांमध्ये सत्तेत असताना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कुठेही महिला चेहऱ्यावर विश्वास दाखवलेला नाही. दिल्लीत रेखा गुप्ता या एकमेव महिला मुख्यमंत्री असतील तर दुसरीकडे या ठिकाणी उपमुख्यमंत्री नसणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर झाला. त्यात भाजपने (BJP) 70 पैकी 48 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. या ठिकाणी सत्तेत असलेल्या आपचा पराभव करीत भाजपने मोठे यश मिळवले. बुधवारी 11 दिवसानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदाबद्दलचा सस्पेन्स संपवला आहे.

BJP Flag
Shivsena Politics : गद्दारी, कोणासोबत? वैभव नाईकांनी घेतली शिवजयंतीला शपथ...

बुधवारी सायंकाळी झालेल्या आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्या उद्या रामलीला मैदानात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पक्षातील दिग्गजांना मागे टाकून त्यांनी खुर्ची मिळवली आहे. विशेष म्हणजे भाजप देशातील 21 राज्यांमध्ये सत्तेत असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी कुठेही महिला चेहऱ्यावर विश्वास दाखवलेला नाही. पण दिल्लीत त्यांनी रेखा गुप्ता यांच्या रुपात महिला नेत्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

BJP Flag
Uddhav Thackeray strategy : उद्धव ठाकरेंची 'ती' रणनीती गळती रोखणार; शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी 'हा' खास प्लॅन

दिल्लीत मुख्यमंत्री निवडताना भाजपने राजस्थान पॅटर्न वापरला आहे. 2023 मध्ये भाजपनं राजस्थानात विधानसभा निवडणूक जिंकली. त्यावेळीही मुख्यमंत्रिपदाबद्दलचा सस्पेन्स बरेच दिवस कायम राहिला. अखेर भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता. ते पहिल्यांदाच आमदार झालेले असताना भाजप नेतृत्त्वाने त्यांना थेट मुख्यमंत्रिपदावर बसवले होते. तोच पॅटर्न आता दिल्लीत राबविण्यात आला आहे. दिल्लीत पहिल्यांदा निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीचं मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांना 2015 आणि 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा आपच्या वंदना कुमारी यांनी पराभव केला होता.

BJP Flag
Shivsena Politics : बाळासाहेबांच्या इच्छेविरुद्ध उद्धव यांची 'ती' कृती, त्यामुळेच शिवसेना फुटली; दीपक केसरकरांचा दावा

दुसरीकडे गेल्या वर्षी निवडणूका झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्र या ठिकाणी दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न भाजपने अवलंबला आहे. मात्र, दिल्लीत उपमुख्यमंत्री नसणार आहे. त्यामुळे या दोन वेगळ्या पॅटर्नचा अवलंब दिल्लीत केला आहे.

BJP Flag
Congress News : काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर; हर्षवर्धन सपकाळांची कसोटी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com