Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी रुग्णालयात जावून 'आप' नेते सत्येंद्र जैन यांची भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची गळाभेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीचे फोटो केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवर शेअर करत 'एका बहाद्दर माणसाची भेट घेतली. हीरो.. ', असं कॅप्शन लिहिलं आहे.
'आप' नेते सत्येंद्र जैन यांना 31 मे 2022 रोजी ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगात असून सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल अहवालाच्या आधारावर जैन यांना 42 दिवसांचा जामीन मंजूर केलेला आहे.
सत्येंद्र जैन हे तिहार तुरुंगात असताना घसरून पडले होते. त्यामध्ये ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना मणक्याचाही त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सत्येंद्र जैन यांना वर्षभरानंतर 42 दिवसांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. मात्र, त्यांना 10 जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावर काय आरोप आहेत?
दरम्यान, सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना ईडीकडून अटक झाली. त्यानंतर ईडीनं त्यांची कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत होते. जैन यांना अटक झाल्यानंतर केजरीवाल सरकाला मोठा धक्का बसला होता.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.