Manish Sisodia News : ''जेल भेजो या फाँसी दे दो...''; सिसोदियांचा तुरुंगातून मोदी सरकारवर हल्लाबोल

Manish Sisodia On Modi Government : तुरुंगातूनही सिसोदियांचं सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर लक्ष्य करणं सुरूच...
Manish Sisodia News
Manish Sisodia NewsSarkarnama

Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनाच्या अर्जावर आणि मुख्य प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होत आहे. मात्र, अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही. तरीदेखील सिसोदियांनी तुरुंगातूनही सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणं सुरूच ठेवलं आहे.

मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांनी तुरुंगातून समस्त देशवासियांना काही दिवसांपूर्वी स्वत:च्या हस्ताक्षरात एक पत्र लिहिलं होतं. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झालं होतं. त्यात देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. आता पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांचं नवीन पत्र ट्विट केलं आहे. यात सिसोदियांनी हिंदी कवितेद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Manish Sisodia News
Sanjay Raut : कुणाचा पोपट मेलाय..हे कळेलं ! ; राऊतांनी फटकारलं.., पवारांच्या पुस्तकात फडणवीसांवर..

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालां(Arvind Kejariwal)नी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच हिंदी भाषेतलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पत्रातून त्यांनी शिक्षणाचा मुद्दा पुढे करत मोदी शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

सिसोदियांनी पत्रात काय म्हटलंय ?

मनीष सिसोदिया यांनी एक हिंदी कविता शेअर केली आहे. त्यात ''अगर, हर गरीब को मिली किताब तो, नफरत की आँधी कौन फैलाएगा. सबके हाथों को मिल गया काम, तो सड़कों पर तलवारें कौन लहराएगा. अगर पढ़ गया, हर गरीब का बच्चा तो चौथी पास राजा का, राजमहल हिल जाएगा असं म्हणत एकप्रकारे इशारा दिला आहे.

Manish Sisodia News
Supreme Court Judge: सर्वोच्च न्यायालयात दोन नव्या न्यायाधिशांची नियुक्ती; सीजेआय' चंद्रचूड यांनी दिली शपथ

जर प्रत्येकाला चांगलं शिक्षण,शिकवण मिळाली तर अशा सुशिक्षित आणि समजदार समाजाला कोण द्वेषाच्या राजकारणात अडकवू शकणार नाही. तसेच गरीब कुटुंबातील एक एक मुलगा शिकला तर चौथी पास असलेल्या राजाचा राजमहल हालायला लागेल. या काव्य पंक्तीद्वारे शिक्षणाचं महत्व अधोरेखित करत मोदींना लक्ष्य केलं आहे.

सिसोदिया लिहितात, अगर हर किसी को मिल गई अच्छी शिक्षा और समझ, तो इनका वाटसेप का विश्वविद्यालय बंद हो जाएगा. पढ़े लिखे और समझदारी की बुनियाद पर खड़े समाज को, कोई कैसे, कौमी नफरत के माया जाल में फंसाएगा.अगर पढ़ गया एक-एक गरीब का बच्चा तो चौथी पास राजा का राजमहल हिल जाएगा.

'' राजमहल हिल जाएगा...''

अगर पढ़ गया समाज का हर बच्चा, तो तुम्हारी चालाकियों और कुनीतियों पे सवाल उठाएगा. अगर गरीब को मिली कलम की ताकत, तो वो अपने 'मन की बात' सुनाएगा. अगर पढ़ गया एक एक गरीब का बच्चा, तो चौथी पास राजा का, राजमहल हिल जाएगा असं म्हणत शिकलेली जनता तुमच्या कूटनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. आणि त्यानंतर तेच तुम्हांला त्यांच्या मन की बात ऐकवतील असाही टोला सिसोदिया यांनी लगावला आहे.

''जेल भेजो या फाँसी दे दो, ये....''

दिल्ली और पंजाब के स्कूलों में हो रहा शंखनाद. पूरे भारत में अच्छे शिक्षा की अलख जगाएगा.जेल भेजो या फाँसी दे दो, ये कारवां रक नहीं पाएगा, अगर पढ़ गया हर गरीब का बच्चा, राजमहल तुम्हारा दिन जाएगा अशा कवितेच्या ओळींद्वारे मोदी सरकार(Modi Government)वर भाष्य केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com