Video Tejashwi Yadav : पिय्यकड पुत्र! तेजस्वी यादव यांचा मद्यधुंद स्थितीतील व्हिडिओ? नेमकं काय घडलं...

Bihar RJD Leader Tejashwi Yadav Viral Video : तेजस्वी यादव यांच्या मूळ व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
Tejashwi Yadav
Tejashwi YadavSarkarnama

Bihar : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये ते मद्यधुंद स्थितीत मीडियाशी संवाद साधताना दिसत आहेत. काही युझर्सकडून हा व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये ‘लालू का होनहार पियक्कड पुत्र’ असे लिहिले आहे.

सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ तीन दिवसांपुर्वीचा असून एडिट केलेला आहे. यादव यांच्या मूळ व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले आहे. मूळ व्हिडिओमधील बोलण्याचा वेग कमी करण्यात आला असून यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे भासवण्यात आले आहे.

सोशल मीडियात अनेकांनी छेडछाड केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. मूळ व्हिडिओ केवळ 30 सेकंदांचा आहे. हा व्हिडिओ अनेक वृत्तवाहिन्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आहे. तेजस्वी यादव यांचा व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ 43 सेकंदांचा आहे. त्यामुळे मूळ व्हिडिओचा वेग कमी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tejashwi Yadav
Yogi Adityanath : CM योगी मोहन भागवतांना भेटणार; निवडणूक निकालानंतर पहिल्याच भेटीने चर्चांना उधाण...

तेजस्वी यादव हे मिडीयाशी बोलताना मद्यधुंद स्थितीत नसल्याचे समोर आले आहे. कुणीतरी खोडसाळपणा करून मूळ व्हिडिओ एडिट केल्याचे दिसते. मुळ व एटिड केलेले व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यातील फरक स्पष्टपणे जाणवतो.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी मिडीयाशी बोलताना केंद्र सरकारच्या खातेवाटपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ज्या बिहारमुळे तुम्ही पंतप्रधान बनला, त्या बिहारच्या लोकांना कुठूनतरी आणून एक खेळणं दिलं आहे. कुणाला कोणते खाते द्यायचे ही जबाबदारी पंतप्रधानांची असते, अशी टीका तेजस्वी यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com