
Congress Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने मतचोरीच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. त्यातच आता ईव्हीएमचा मुद्दाही तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसला पराभवाचा धक्का बसलेल्या निवडणुकीत ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराने थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
कोर्टानेही निवडणुकीशी संबंधित सर्व साहित्य सुरक्षितपणे कुलुपबंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. दिल्ली विद्यापीठ छात्र संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा कल देशातील युवकांच्या मतांशी जोडला जातो. नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत आरएसएससी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दणदणीत विजय मिळवला.
विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदावर एबीव्हीपीने कब्जा केला. काँग्रेसशी संलग्न एनएसयूआय या संघटनेच्या उमेदवार जोसलिन नंदिता चौधरी यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चौधरी यांच्यासह विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष रौनक खत्री यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी केलेल्या याचिकेनुसार, 18 सप्टेंबरला झालेल्या मतदानावेळी ईव्हीएमध्ये छेडछाड करण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून न्यायालयीन देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे की, ईव्हीएम मशिनवर जाणीवपूर्वक एबीव्हीपीचे अद्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या नावासमोर निळ्या शाईच्या खूणा करण्यात आल्या होत्या. या खूणा मशिनजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला स्पष्टपणे दिसत होत्या. मतदारांना एका उमेदवाराविषयी प्रभावित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे वकील मोहिंदर रुपल यांनी हे आरोप फेटाळून लावले. ईव्हीएममध्ये कसलीही छेडछाड झालेली नाही. कुणीतरी केवळ अंगठ्याचे ठसे उमटवले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने विद्यापीठाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले की, ईव्हीएमसह निवडणुकीशी संबंधित इतर सर्व साहित्य सुरक्षितपणे ठेवण्यात यावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.