New Delhi : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरूवारी त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानुसार ते शुक्रवारी जेलमधून बाहेर येणार होते. पण दिल्ली हायकोर्टाने जामिनाला तात्पुरती स्थगिती देत केजरीवालांना झटका दिला आहे.
ईडीने दिल्लीतील कोर्टाच्या निकालाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. जामिनाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी ईडीने कोर्टात केली होती. या मागणीला केजरीवालांच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. पण त्यानंतरही कोर्टाने जामिनाला स्थगिती देत निकाल राखून ठेवला.
केजरीवालांच्या जामिनाला दिलेल्या स्थगितीवर सोमवारी किंवा मंगळवारी अंतिम निकाल येऊ शकतो. त्यामुळे तोपर्यंत केजरीवालांना जेलमध्ये राहावे लागणार आहे. कोर्ट काय निकाल देणार, हे महत्वाचे ठरणार आहे. कोर्टाने जामीन नाकारल्यास केजरीवालांकडून सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाईल.
दरम्यान, सुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने विशेष न्यायालयात आपल्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी मिळाली नसल्याचा दावा केला. केजरीवालांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी म्हणाले होते की, कथित घोटाळ्यात केजरीवालांना एकही पैसा मिळालेला नाही. कनिष्ठ कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम 45 चा योग्य विचार केला आहे. हे कलम जामीन रोखु शकत नाही, असे निकाल आहेत.
केजरीवाल हे 2022 पासून या केसमध्ये सामील नव्हते, से ट्रायल कोर्टाने म्हटले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये चार लोकांचा जबाब घेण्यात आला. पण कुणीही त्यांच्याविषयी बोलले नाही.
मगुंटा रेड्डींनी केजरीवालांचा उल्लेख केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला, पण ईडीने त्याला विरोध केला नाही. कनिष्ठ कोर्टाच्या निकालाला स्थगिती म्हणजे केजरीवालांना जेलमध्येच थांबावे लागेल, असेही सिंघवी म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.