New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात (Delhi Liquor Policy Case) सक्तवसुली संचालनालयाने आज केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
मागील वर्षी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कविता यांना समन्स पाठवू नये, असे आदेश दिल्याचा दावा कविता यांनी केला होता. त्यावर ईडीने हा तात्पुरता दिलासा होता, आता तो आदेश लागू होत नाही, असे ईडीने म्हटले होते. या प्रकरणात आतापर्यंत कविता यांची तीनदा चौकशी झाली आहे. त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज ईडीने या प्रकरणी त्यांच्या घरी छापा टाकून चौकशी केली. काही तासांनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर त्यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात येणार आहे. कथित घोटाळ्यातील एक आरोपी अमित अरोरा यांनी कविता यांचे चौकशीदरम्यान नाव घेतले आहे. त्यामुळे कविता यांची चौकशी सुरू आहे.
केजरीवालांवरही टांगती तलवार
कथित मद्य घोटाळाप्रकरणी आपचे नेते मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंग यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाही आतापर्यंत आठवेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पण त्यांनी एकदाही हजेरी लावली नाही. त्यामुळे ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे केजरीवालांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.