Delhi News : महापौरपदाची निवडणूक पुढे जाणार? सभागृहात 'भाजप-आप'मध्ये गदारोळ

Delhi News : आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सभागृहातच मोठा गदारोळ उफाळून आला.
Delhi News Mcd AAP
Delhi News Mcd AAPSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्ली महानगरपालिकेची निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता दिल्लीचा महापौर कोणाचा होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. दिल्लीचा महापौर कोण होणार याचा आज फैसला होणार होता. मात्र, आज दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सभागृहातच मोठा गदारोळ उफाळून आला. सभागृहात मोठा गोंधळ माजला आहे. यामुळे आज महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर वाटत आहे.

दिल्ली महानगरपालिकेत मागील १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत आपने भाजपच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत, भाजपकडून सत्ता खेचून घेतली. 'आप'ला दिल्ली मनपात १३४ तर भाजपला १०४ जागा आणि कॉंग्रेसला केवळ 9 जागा मिळाल्या होत्या

आपनकडून शैली ओबराय यांना महापौर पदाची उमेदवारी दिली गेली आहे. तर उपमहापौर पदाची उमेदवारी मोहम्मद इकबाल यांना दिली आहे. भाजपने रेखा गुप्ता यांना महापौर पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रेखा गुप्ता या तिसऱ्यांदा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदीही कार्यरत आहेत.महापौरपदाच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीच्या राज्यपालांनी सत्या शर्मा यांची पिठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे.

Delhi News Mcd AAP
Nawab Malik News : मलिकांना दिलासा नाहीच ! ; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला..

आज सुरुवातीला सभागृहात सर्व नगरसेवकांना शपथ दिली जाणार होती. मात्र, पिठासीन अधिकारी सत्या शर्मा यांनी उपराज्यपाल नियुक्त 10 स्वीकृत नगरसेवकांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. याला आपने जोरदार विरोध करत अगोदर जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना शपथ देण्याची मागणी केली. यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला.

स्वीकृत सदस्य हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा आपने आरोप केला. महापौर निवडणुकीत 274 सदस्य करणार मतदान करणार दिल्ली महापौर निवडणूकीत 250 लोकनिर्वाचित सदस्यासह 7 लोकसभा खासदार, 3 राज्यसभा खासदार आणि उपराज्यपालांनी नामनिर्देशीत केलेल्या 14 आमदारांना मतदानाचा अधिकार आहे.

Delhi News Mcd AAP
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

भाजपकडे प्रथमदर्शनी संख्याबळ नसताना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार दिल्याने निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. भाजप ऐन वेळी काही करू शकते. या भीतीने आप बहुमत असूनही जपून पावलं टाकत आहे. 6 सदस्य असलेल्या स्थायी समितीच्या निवडणूकीत भाजपचे २ सदस्य सहज निवडून येतील. मात्र, भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने भाजप काही चमत्कार घडून आणेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com