CJP Protest : दिल्लीत महिला आंदोलकावर हात उचलणं भोवलं! वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याला ड्युटीवरुन हटवलं

Delhi protest police controversy: दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकावर हात उचलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला ड्युटीवरून हटवण्यात आले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Sandeep Lamba
Sandeep LambaSarkarnama
Published on
Updated on

CJP protest in Delhi latest news: दिल्लीत नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर दिल्ली पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. जंतर-मंतर परिसरात आंदोलन करत असताना एका महिला आंदोलकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना त्या ठिकाणच्या ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठवण्यात आले आहे.

Sandeep Lamba
Naimisha Pradhan education : ट्रोलिंगचा मनस्ताप! धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने डीएक्टिव्हेट केलं इन्स्टाग्राम; नैमिषा प्रधान नक्की किती शिकलीये?

गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. मात्र, 22 जुलै रोजी आंदोलन अधिक तीव्र झाले. आंदोलकांना हटवताना पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर केला.

या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी एका महिला आंदोलकाला अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांनी जोरात कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला.

सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. याच दरम्यान समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा हे एका महिलेला कानाखाली मारताना स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात आला.

Sandeep Lamba
Top 10 News : "जेपी नड्डांना लाज वाटली पाहिजे...", CJP प्रवक्ता पहिल्यांदाच थेट मंत्र्याला भिडला; तलाठी भरती जाहीर, तब्बल 5707 जागांसाठी MPSC घेणार परीक्षा - वाचा महत्त्वाच्या टॉप 10 घडामोडी!

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचा मुद्दा बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयातही उपस्थित करण्यात आला.

वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयाचे लक्ष या घटनेकडे वेधत व्हायरल व्हिडिओमध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी महिलेला जोरात कानाखाली मारताना दिसत असल्याचे सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून योग्य कारवाई करण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com