Vijender Singh News : काँग्रेसला ‘ठोसा’; बॉक्सर विजेंदर सिंग भाजपच्या ‘रिंग’मध्ये

Lok Sabha Election 2024 : विजेंदर सिंग यांनी 2019 मध्ये दिल्लीतून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. ते भाजपवर सातत्याने टीका करत होते.
Vijender Singh with Rahul Gandhi
Vijender Singh with Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : देशाला बॉक्सिंगमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे बॉक्सर आणि काँग्रेसचे नेते विजेंदर सिंग (Vijender Singh News) यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहाेचलेला असताना विजेंदर सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला. 

भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या उपस्थितीत विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून विजेंदर सिंग यांना मथुरेतून भाजपच्या (BJP) उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरोधात काँग्रेसकडून (Congress) तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावर त्यांनी एक्स हँडलवर ‘जनतेला जिथून हवे, मी तयार आहे,’ असे म्हटलं होतं.

Vijender Singh with Rahul Gandhi
ED in Supreme Court : ED च्या वकिलांमध्ये भाजप नेत्या बांसुरी स्वराज यांचे नाव; नेमकं काय आहे प्रकरण?

विजेंदर सिंग हे 2019 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांनी दिल्लीतून लोकसभेची (Lok Sabha Election 2024) निवडणूकही लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ते राजकारणात फारस सक्रिय राहिले नाहीत. डिसेंबर 2023 मध्येच त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले होते. ‘राजकारणाला राम राम’, असे ट्विट त्यांनी केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना लोकसभेचे तिकीट मिळू शकते, या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, विजेंदर सिंग यांनी अनेकदा भाजपसह मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही ते सहभागी झाले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हिंदूविरोधी म्हणून त्यांच्यावर टीका केली जात होती.

दिल्लीत महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतरही विजेंदर सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजेंदर सिंग यांनी आपण देशाच्या विकासासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

R

Vijender Singh with Rahul Gandhi
Sanjay Singh News : खासदार संजय सिंह निवडणुकीत प्रचार करणार का? ‘या’ पाच अटींवर जेलमधून येणार बाहेर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com