Delhi News : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या अधिकाराशी संबंधित असलेले 'दिल्ली सेवा बिल' लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसला आहे. या विधेयकाच्या मंजूरीदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी कडाडून विरोध करत सभागृहातून सभात्याग केला.
केंद्र सरकारच्यावतीने 'दिल्ली सेवा विधेयक' लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकामध्ये दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या संबंधित अंतिम अधिकार उपराज्यपालांना देण्याची तरतूद आहे. याच विधेयकावरून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून केंद्र सरकार आणि केजरीवाल सरकारमध्ये वाद सुरू आहे.
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग आणि बदल्यांचे अधिकार हे दिल्ली सरकारचे असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिला होता. मात्र, यानंतर केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत न्यायालयाचा हा निर्णय पालटला. आता केंद्र सरकारला या अध्यादेशाला सहा महिन्यात संसदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. यानंतर या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होईल.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विधेयकाच्या पार्श्वभूमीवरच गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तसेच या विधेयकाच्या मंजूरीला विरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, लोकसभेत मोदी सरकारचे बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर झाले. तर आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.