Kapil Mishra : दंगल घडवली? दिल्लीतील रेखा गुप्ता सरकारला पहिला दणका; भाजप मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

FIR against Kapil Mishra : 2020 च्या दंगलीप्रकरणी कपिल मिश्रा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहेत. मिश्रा यांच्यावर यापूर्वीही द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप झाला आहे.
rekha gupta government
rekha gupta governmentsarkarnama
Published on
Updated on

Navi delhi News : नुकताच राजधानी दिल्लीत भाजपची सत्ता आली असून रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. पण या सरकारला दिल्ली ट्रायल कोर्टने मोठा धक्का दिला आहे. तर रेखा गुप्ता सरकारमधील एका मंत्र्याच्याविरोधार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली असून या मंत्र्याच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान याच मंत्र्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणे देण्याचाही आरोप करण्यात आला आहे.

2020 मध्ये ईशान्य दिल्लीत मोठी दंगल उसळली होती. याच दंगलीवरून मोहम्मद इलियास यांनी याचिका दाखल केली होती. ज्यावरून कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना दिलासा देण्यास ट्रायल कोर्टाने नकार दिला आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाने यासंदर्भातील दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद देखील फेटाळून लावला आहे. ट्रायल कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे मिश्रा यांच्या अडचणी येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. या दंगलींमध्ये 53 जणांचा मृत्यू आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले होते.

फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीप्रकरणी दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून पुढील चौकशी करण्याचे निर्देश राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. यामुळे कोर्टाने कपिल मिश्रा यांना मोठा झटका दिला आहे. दिल्ली दंगलीशी संबंधित एका प्रकरणात कपिल मिश्रा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी याचिकेद्वारे राऊस अव्हेन्यू न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मोहम्मद इलियास यांनी दाखल केली होती. तर दिल्ली दंगलीप्रकरणी कपिल मिश्रा आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.

rekha gupta government
Delhi Government News : मोदींनी दिलेलं 'ते' आश्वासन पूर्ण करण्यात रेखा गुप्ता अपयशी; गॅरंटी जुमला ठरणार?

इलियास यांनी, कपिल मिश्रासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करताना पाच घटनांचा उल्लेख केला आहेत. या घटनाक्रमावरूनच आता गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरसिया यांनी मंगळवारी (ता.1) या प्रकरणात एफआयआर आणि तपास आवश्यक असल्याचा निर्णय दिला. तसेच न्यायालयाने तक्रार खोटी असल्यास पोलिसांनी इलियासविरुद्ध कारवाई करावी असेही सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद फेटाळला

कपिल मिश्रा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याच्या मागणीला दिल्ली पोलिसांनी विरोध केला होता. तसेच मिश्रा यांच्याविरोधात कट रचण्यात येत असल्याचा युक्तिवाद केला होता. मोहम्मद इलियास यांनी दाखल केलेल्या याचिकेत, कपिल मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्दमपुरीमध्ये रस्ता आडविला होता. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रस्त्यावरील विक्रेत्यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. तर त्यांच्या शेजारी दिल्ली पोलिस ईशान्य उपायुक्त आणि इतर अधिकारी उभे होते असाही दावा करण्यात आला आहे. तर कपिल मिश्रा यांनी या दंगलीवेळी धमकी दिली होती, असेही याचिकेत म्हटलं आहे.

rekha gupta government
Delhi Assembly Update : ‘जय भीम’चा नारा देणारे आमदार निलंबित, मोदी-मोदी म्हणणारे सुरक्षित!

यापूर्वीही वाद

कपिल मिश्रा यांच्यावर फेब्रुवारी 2020 मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी द्वेषपूर्ण भाषणे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी केलेल्या जातीयवादी विधानांबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला होता. जो आचारसंहितेचे उल्लंघनाशी संबंधित होता. त्या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. या नवीन निर्णयामुळे मिश्रा यांच्या अडचणीत आता भर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com