BJP Dinner Diplomacy : दिल्लीत पडद्यामागे हाय-व्होल्टेज घडामोडी; विशेष अधिवेशनाआधी भाजपचा 'मास्टरप्लॅन'; राज्यनिहाय खासदारांसाठी 'डिनर डिप्लोमसी'

Parliament special session News : संसदेचे सोमवारपासून चार दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाणार आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Dehli News : केंद्र सरकारने डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून दिल्ली दरबारी वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. डिलिमिटेशन बिल संमत करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी खासदारांची मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव केली जात आहे. त्यासाठी भाजपने खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

त्यासाठी गेल्या दोन दिवसापासून राज्यनिहाय खासदारांसाठी 'डिनर डिप्लोमसी'चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी लोकसभेत हे विधेयक सादर केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात अभूतपूर्व घडामोडी सुरु आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भाजपच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते.

भाजपकडून (BJP) प्रत्येक राज्यातील खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भाजपच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथील भाजप खासदारांसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याठिकाणी उद्या होत असलेल्या डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रविवारी रात्री बिहारमधील भाजपचे खासदार मंत्री ललन सिंह यांच्या निवासस्थानी भेटणार आहेत. मंत्री किरेन रिजिजू हे ईशान्य भारतातील खासदारांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत डिलिमिटेशनबाबत खासदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या विधेयकासाठी मतदान कसे करायचे, पक्षाकडून पुढच्या घडामोडींसाठी काय नियोजन केले जाणार आहे? याबाबत खासदारांना मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

Narendra Modi, Amit Shah
Pune BJP MP : पुण्याच्या खासदाराला केंद्रात महत्त्वाचं पद; राज्यसभेचे कामकाज चालविण्याची मिळणार संधी

दिल्लीत वेगवान घडामोडी

डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत देखील महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी तीन वाजता दाखल झाल्याची माहिती आहे. डिलिमिटेशन विधेयकासाठी आकड्यांची जमावाजमव सुरु आहे.

संसदेचे सोमवारपासून चार दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हायव्होल्टेज घडामोडी घडताना दिसत आहेत. येत्या काळात भाजपाची फ्लोवर मॅनेजमेंट कशी असणार याबाबत रणनीती आखली जात असून त्याबाबतच मार्गदर्शन केले जात आहे.

Narendra Modi, Amit Shah
Manoj Jarange Patil : 500 कोटींचा वाद पेटला! मनोज जरांगे पाटलांचा मास्टरस्ट्रोक; थेट 'हा' मोठा निर्णय घेत सरकारला ललकारले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.