Devendra Fadnavis News : 'महाराष्ट्र आणि काशी यांचे विद्वत्ता आणि संस्कृतीचे नाते'; असे फडणवीस का म्हणाले !

Lok Sabha News 2024 : काशी शहराचे पुनर्निर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले आणि आज काशी विश्वनाथ कॉरिडॉर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे तयार केला. यंदाचे वर्षे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे, तर अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्षे आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Political news : देशाचे पंतप्रधान यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांना विजयी करण्यासाठी मराठी माणसाचा सहभाग इतका मोठा आहे, याचा मला विशेष आनंद आहे. यापुढील काळातही पंतप्रधान मोदी यांच्या मागे मराठी माणूस तेवढ्याच ताकदीने उभा राहिल, असा मला विश्वास आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काशी येथे आयोजित काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी महाराज, मुंबई भाजपाचे (BJP) अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री भागवत कराड, जौनपुर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार कृपाशंकर सिंह, मोहित भारतीय आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, काशी येथे आपण प्रचाराला आलो नाही. त्याची गरज सुद्धा नाही. येथील नागरिकांनी देशाचे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Yogendra Yadav News : उत्तर प्रदेशात भाजपला फटका, फक्त 40-42 जागा मिळतील; योगेंद्र यादव यांनी सांगितले कारण

मोदी यांनी केलेली कामे पाहता केवळ काशीच नव्हे तर देशातील विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने मोदींच्या बाजुने उभे राहतील, याची मला खात्री आहे. या काशी शहराचे पुनर्निर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले आणि आज काशी विश्वनाथ कॉरिडॉर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे तयार केला. यंदाचे वर्षे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे, तर अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्षे आहे. या कालखंडात मला वाराणसीत येण्याचे भाग्य लाभले, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्र आणि काशी यांचे विद्वत्ता आणि संस्कृतीचे नाते आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

फडणवीस म्हणाले, सनातन संस्कृती कधीही भेदभाव करीत नाही. या संस्कृतीचे प्रवाह कितीही भिन्न असले तरीही या संस्कृतीचा विचार हा केवळ मानवतेचा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या साहित्यात कायम काशीचा उल्लेख आहे. नवभारत म्हणजे केवळ रस्ते, इमारती, मोठी शहरे निर्माण करणे नाही तर यामध्ये सनातन संस्कृती देखील आहे. देशाच्या प्रगतीसाठी ठामपणे निर्णय घेणाऱ्या हातामध्ये नेतृत्व देण्याची गरज आहे. ते काम नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेच करू शकत असल्याने महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा संकल्प सोडल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Political Tourism : 300 मोठी हॉटेल्स, 1200 लक्झरी वाहने बुक..! काशीमध्ये बडे नेते, मंत्र्यांचे ‘पॉलिटिकल टुरिझम’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com