Lok Sabh Election : लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा एक जूनला पार पडतो आहे. देशाच्या निवडणुकीचा निकाल बदलण्याची ताकत उत्तर प्रदेशमध्ये आहे. कारण येथे लोकसभेच्या तब्बल 80 जागा आहेत. त्यातील भाजपकडे 62 जागा आहेत. उत्तर प्रदेशामध्ये भाजपची मोठी ताकत आहे. त्याच जोरावर भाजप मित्रपक्षांसोबत 72 जागा जिंकेल, असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये भाजप 40 जागापर्यंत खाली येऊ शकतो, असा दावा राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केला आहे.
'उत्तर प्रदेशमध्ये Uttar Pradesh मी एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त फिरलो आहे. इथल्या सर्वसामान्य लोकांशी माझी चर्चा झाली आहे. मला जे लोक भेटतात त्यातील दहापैकी एक जण म्हणतो मागील वेळी आम्ही भाजपाला मतदान दिले होते. मात्र यावेळी देणार नाही. मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मत देणारा पुन्हा त्याच पक्षांना मत देताना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या मतदारांमध्ये घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला 50 ते 55 जागा मिळू शकतात मात्र जास्त नुकसान झाले तर भाजप 40 ते 42 जागांपर्यंत खाली जाऊ शकतो', असा अंदाज योगेंद्र यादव Yogendra Yadav यांनी व्यक्त केला आहे.
बहुजन समाजातील पक्ष (बीएसपी) कमजोर बनला आहे. त्यामुळे त्याची मते ही काँग्रेसकडे शिफ्ट होतील. त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची मतं वाढताना दिसून येत आहेत. मात्र, त्यातुलनेत भाजपची मतं वाढताना दिसत नाही. त्याचाच फटका उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बसेल, असा अंदाज देखील योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लोकप्रिय आहेत. सरकारची मोफत राशन देण्याची योजना देखील लोकप्रिय आहे. मात्र, खासदारांच्या विषयी लोकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा फटका भाजपला बसताना दिसतो आहे.त्यामुळे देखील ते काही जागा गमावतील, असे योगेंद्ग यादव म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.