Lt General Dhiraj Seth: संंरक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा; धीरज सेठ देशाचे नवे लष्करप्रमुख;कधीपर्यंत असणार कार्यकाळ?

New Army Chief of India : भारतीय सैन्याचे उपलष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ हे सध्या कार्यरत आहे. ते आता 30 जून 2026 रोजी दुपारी भारतीय लष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. सेठ यांचा समावेश हा भारतीय लष्करामधील अनुभवी अधिकाऱ्यांमध्ये होतो.
Dheeraj seth  .jpg
Dheeraj seth .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा लष्करप्रमुखपदाचा कार्यभार हा येत्या 30 जून रोजी संपुष्टात येणार आहे.

भारतीय सैन्याचे उपलष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ हे सध्या कार्यरत आहे. ते आता 30 जून 2026 रोजी दुपारी भारतीय लष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. सेठ यांचा समावेश हा भारतीय लष्करामधील अनुभवी अधिकाऱ्यांमध्ये होतो. त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असणार आहे.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे पुढील लष्करप्रमुख (COAS) असल्याची घोषणा भारत संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतपणे करण्यात आली आहे. सेठ यांनी सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ व तितकीच गौरवशाली लष्करी कारकि‍र्दीत देशाच्या सैन्याचं आधुनिकीकरण आणि युद्धतंत्रात अभूतपूर्व योगदान राहिलं आहे.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (NDA) माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1986 मध्ये ते भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठित आर्मर्ड कॉर्प्समध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. आपल्या 40 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी सामरिक,कार्यान्वयन आणि संस्थात्मक स्तरांवर व्यापक अनुभव मिळवला आहे.

Dheeraj seth  .jpg
BJP News: केंद्रीय संरक्षण मंत्र्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर कोसळला; भाजप नेते राजनाथ सिंह यांच्या पुतण्याला भरधाव बसनं उडवलं

त्यांनी लष्करी शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी ज्युनियर कमांड कोर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये 'सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थी अधिकारी' पदक जिंकले. त्यांनी भारतातील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील प्रतिष्ठित कमांड अँड स्टाफ कोर्स आणि फ्रान्समधील पॅरिस येथील प्रतिष्ठित कमांड अँड स्टाफ कोर्समध्येही सहभाग घेतला आहे, जे त्यांचा जागतिक सामरिक दृष्टिकोन दर्शवते.

दुर्मिळ सन्मान...

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांना भारतीय लष्कराच्या इतिहासात एक दुर्मिळ सन्मान प्राप्त आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दोन ऑपरेशनल आर्मी कमांड्सचे नेतृत्व केले आहे:

अद्वितीय अनुभव

धीरज सेठ यांना अडीच वर्षांहून अधिक काळ पश्चिम आघाडीवर सामरिक देखरेख ठेवण्याचा अद्वितीय अनुभव आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून, त्यांनी भारतीय लष्कराच्या प्रमुख स्ट्राइक फॉर्मेशन्सपैकी एक असलेल्या सुदर्शन चक्र कॉर्प्सचे नेतृत्व केले. त्यांनी दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) म्हणूनही काम पाहिले आहे, जिथे त्यांनी प्रजासत्ताक दिनासारख्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लष्करी कार्यक्रमांचे आणि मोठ्या उत्सवांचे नेतृत्व केले.

Dheeraj seth  .jpg
MLC Election : निवडणुकीतून माघार घेतली तरीही आमदार झाले : महाराष्ट्राच्या इतिहासातील अजब चमत्कार; याचमुळे धास्तावले आहेत महायुतीचे नेते

धीरज सेठ यांनी देशाची सर्व प्रकारच्या कठीण भौगोलिक आणि कार्यात्मक परिस्थितीत सेवा केली आहे. त्यांच्या प्रमुख कमांड नियुक्त्यांमध्ये यांचा समावेश आहे. एका आर्मर्ड रेजिमेंटचे (टँक रेजिमेंट) नेतृत्व केले असून एका आर्मर्ड ब्रिगेडचे नेतृत्व केले.

दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान बंडखोरीविरोधी दलाचे यशस्वीपणे नेतृत्व केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताला गौरव मिळवून दिला आहे. त्यांनी अंगोला येथील संयुक्त राष्ट्र मोहिमेत ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून काम केले. सैन्य आधुनिकीकरण आणि 'नेक्स्ट-जेन' व्हिजनचे शिल्पकार म्हणतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com