Minab Girls School Attack : 150 शाळकरी मुलींच्या मृत्यूने जग हादरलं; ‘हल्ल्यामागे इराणच’, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Donald Trump alleges Iran carried out the deadly attack on a girls school in Minab during the escalating US-Israel conflict with Iran : इराणच्या मिनाब शहरातील मुलींच्या शाळेवरील हल्ल्याबाबत अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Minab Girls School Attack
Minab Girls School AttackSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump Iran allegation : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाच्या सुरवातीलाच, इराणमधील मिनाब शहरातील मुलींच्या शाळेवर हल्ला झाला. या हल्ल्यात 150 पेक्षांजास्त मुलींचा मृत्यू झाला.

या हल्ल्यातील मृत्यूच्या दफनविधीचा फोटो जगात व्हायरल झाल्यानंतर, या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध करण्यात आला. इराणने या हल्ल्याला अमेरिकेला दोषी धरले. परंतु अमेरिकेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. परंतु आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

अमेरिकेने इराणमध्ये सैनिक घुसवण्याची भाषा सुरू केली आहे. इराणने शरणागती पत्करावी, असे सुनावलं आहे. इराणने देखील शरणागतीच्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत. यामुळे आखाती देशातील युद्ध थांबणार नाही असे चिन्हं आहेत. यातच मिनाब शहरातील मुलींच्या शाळेवरील (School) हल्ल्यावरून, अमेरिका आणि इराणमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मुलींच्या शाळेवरील हल्ल्याला इराणला जबाबदार धरले आहे. हा हल्ला इराणकडून झाल्याचे वाटते. इराणच्या शस्त्रांची अचूकता कमी आहे. त्यातूनच त्यांच्याकडून चुकीच्या ठिकाणी बॉम्ब पडला, असे म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही शाळा जाणीवपूर्वक लक्ष्य करणार नसल्याचे म्हटलं आहे.

Minab Girls School Attack
Sharad Pawar Political Career : पवारांची ‘गोल्डन पॉलिटिकल जर्नी’! कारकीर्द आता 'साठी'कडे, 50 वर्षे लोकप्रतिनिधीत्व करणारे दिग्गज नेते एका क्लिकवर...

शाळेवरील हल्ल्याची जबाबदारी अमेरिकेने मात्र घेतलेली नाही. तसंच इस्त्रायलने देखील या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. शाळेवरील हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू लहान मुलींचे झाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या हल्ल्याची टीका होत आहे.

Minab Girls School Attack
Girish Mahajan Nashik Guardian : महाजनांचा मोठा दावा! 'नाशिकचा पालकमंत्री मीच'; शिंदेसेना-राष्ट्रवादीनं कान टवकारले

शाळेवरील हल्ल्याला इराणने अमेरिकेला जबाबदार धरले आहे. अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनीच, मुलींच्या शाळेला लक्ष केल्याचे इराणने म्हटलं आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कॉर्प्सने संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकेच्या अल-धाफरा एअरबेसवर ड्रोन आणि अचूक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना घरातूनच धक्का

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी, मेरी एल. ट्रम्प यांनी या दफनविधाचा फोटो शेअर करत, "मी आव्हान देते की, कुणीही या क्रूर हल्ल्याचे समर्थन करून दाखवावे. तसंच या युद्धाचा जाहीर निषेध केला." या संघर्षामुळे असंख्य जीव आणि अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची सावरासारवी?

मेरी एल. ट्रम्प यांच्या या पोस्टमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या युद्धखोरीला त्यांच्चया घरातूनच विरोध होताना पाहायला मिळला. यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता, मुलींच्या शाळेवरील हल्ल्याबाबत इराणकडेच बोट दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय दबाव झटकवून टाकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सावरासावर सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com