US Iran conflict : इराणसह संपूर्ण जगासाठी पुढचे 10 दिवस महत्वाचे! ट्रम्प यांचा प्लॅन फसला तर मोठा धमाका...

Donald Trump on US Iran conflict : डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक नवी घोषणा केली आहे. त्यामुळे आता इराण आणि अमेरिकेत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Trump Iran Tensions | Strait of Hormuz Crisis Delay
Donald Trump addressing media on US-Iran tensions, highlighting the Strait of Hormuz crisis and delay in military action.Sarkarnama
Published on
Updated on

Strait of Hormuz Crisis Delay : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 मार्च रोजी होर्मुझची सामुद्रधुनी 48 तासांत खुली न केल्यास इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी हा हल्ला 5 दिवसांसाठी स्थगित केला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी हे हल्ले 10 दिवसांसाठी स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मात्र, यावेळी ट्रम्प यांनी इराणने केलेल्या विनंतीनंतर त्यांच्या ऊर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांवरील हल्ले 10 दिवसांसाठी स्थगित करत असल्याचा दावा केला आहे.

ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे आता इराण आणि अमेरिकेत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Trump Iran Tensions | Strait of Hormuz Crisis Delay
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? संसदेत दिलेत संकेत, सर्व मुख्यमंत्र्यांना निरोप

ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, 'इराण सरकारने केलेल्या विनंतीनुसार, मी ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा कालावधी आणखी 10 दिवसांसाठी म्हणजेच सोमवार, 6 एप्रिल 2026 रात्री 8 वाजेपर्यंत, ईस्टर्न टाईम स्थगित करत आहे. चर्चा चांगल्या प्रकारे सुरू आहे.' त्यांच्या या पोस्टमुळे आता या दोन्ही देशांमध्ये संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Trump Iran Tensions | Strait of Hormuz Crisis Delay
Excise Duty : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? सर्वसामान्यांना दिलासा!

शिवाय ट्रम्प यांनी इराणने विनंती केल्याचा दावा केला असला तरी इराणकडून अद्याप याबाबत काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना इराण देखील प्रत्युत्तर देत आहे. इराणकडून प्रदेशात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत.

ज्यामध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आणि इतर पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं आहे. ज्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता. अशातच ट्रम्प यांनी हल्ले 10 दिवस थांबवल्याची घोषणा केल्यामुळे चर्चेतून मार्ग निघणार का आणि हे युद्ध थांबणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com