Trump-Modi Phone: गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोदींना 4 वेळा फोन पण...; नेमकं काय घडलंय जाणून घ्या

Trump-Modi Phone: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या आठवड्यात ४ वेळा फोन केला पण मोदींनी त्यांचा फोन घेतला नाही, असा दावा एका परदेशी वृत्तपत्रानं केला आहे.
Donald Trump
Donald Trump
Published on
Updated on

Trump-Modi Phone: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या आठवड्यात ४ वेळा फोन केला पण मोदींनी त्यांचा फोन घेतला नाही, असा दावा एका परदेशी वृत्तपत्रानं केला आहे. यावरुन पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यावर नाराज असल्याचं तसंच त्यांनी मौनातून ट्रम्प यांना इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केला आहे. तेव्हापासून भारत-अमेरिकेत व्यापारावरुन धुसफूस सुरु आहे.

Donald Trump
DK Shivkumar: विधानसभेत RSSची प्रतिज्ञा म्हणणाऱ्या डी के शिवकुमार यांचा माफीनामा! भाजपत प्रवेशावर अन् काँग्रेसबाबत केलं महत्वाचं विधान

जर्मनीतील वृत्तपत्र Frankfurter Allgemeine Zeitung (FAZ) यामध्ये दावा करण्यात आला आहे की, ट्रम्प यांनी मोदींना चार वेळा फोन करण्याचे प्रयत्न केले. पण मोदींनी त्यांचे फोन कॉल्स घेण्यास नकार दिला. गेल्याच आठवड्यात हा प्रकार घडला, अशी माहिती बर्लिनस्थित ग्लोबल पब्लिक पॉलिसी इन्स्टिट्युटचे सहसंस्थापक आणि संचालक थॉर्स्टन बेनर यांनी आपल्या ट्विटरवर हा दावा केला आहे. हा दावा करताना त्यांनी FAZ या वृत्तपत्राची बातमी शेअर केली आहे.

Donald Trump
Maratha Aandolan : जरांगेंना मोठा झटका! हायकोर्टानं आझाद मैदानात आंदोलनासाठी केली मनाई कारण...; याचिकाकर्त्यांनाही फटकारलं

३१ जुलै रोजी ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत खळबळजनक विधान केलं होतं. "भारत रशियासोबत काय करतोय याची आम्हाला फिकीर नाही. या दोन्ही देशांनी त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी खाली घेऊन जाव्यात" असं त्यांनी म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या या अपमानास्पद विधानाला पंतप्रधान मोदींनी १० ऑगस्ट रोजी उत्तर दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भारताची अर्थव्यवस्थेची वाटचाल विकासाच्या दिशेन सुरु आहे. लवकरच तिचा जगातील टॉप तीनमध्ये समावेश होणार आहे.

Donald Trump
Prakash Ambedkar: आंबेडकर जरांगेंवर पुन्हा बरसले! म्हणाले, संधी होती तेव्हा पाणी फिरलं आणि आता लढ्याची भाषा करताय

FAZ वृत्तपत्रानं यामध्ये असंही म्हटलं की, ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळं मोदी नारा झाले होते. ट्रम्प यांचा दृष्टीकोन हा कॅपिटलिस्टचा आहे. इतर देशांना अमेरिकेच्या मार्केटवर अवलंबून राहण्यास भाग पाडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. पण मोदींनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात याला विरोध केला. उलट अमेरिकेसोबत सहकार्याची भावना ठेवला, यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला कुठलाही धक्का लागू न देता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com