DK Shivkumar: विधानसभेत RSSची प्रतिज्ञा म्हणणाऱ्या डी के शिवकुमार यांचा माफीनामा! भाजपत प्रवेशावर अन् काँग्रेसबाबत केलं महत्वाचं विधान

DK Shivkumar: कर्नाटकच्या विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिज्ञा 'नमस्ते सदावत्सले...' म्हटल्यावरुन उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणी सुरु झाली होती.
DK Shivkumar
DK Shivkumar
Published on
Updated on

D K Shivkumar: कर्नाटकच्या विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिज्ञा 'नमस्ते सदावत्सले...' म्हटल्यावरुन उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणी सुरु झाली होती. यामुळं शिवकुमार आता भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. पण अखेर या सर्व चर्चांवर शिवकुमार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी संघाची प्रतिज्ञा सभागृहात म्हटल्याबद्दल जाहीररित्या माफी मागितली आहे. तसंच भाजपत प्रवेशाच्या चर्चांवर आणि काँग्रेसबाबत महत्वाचं विधान केलं आहे.

DK Shivkumar
Maratha Aandolan : जरांगेंना मोठा झटका! हायकोर्टानं आझाद मैदानात आंदोलनासाठी केली मनाई कारण...; याचिकाकर्त्यांनाही फटकारलं

शिवकुमार म्हणाले, "माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसंच संघाची राजकीय विंग असलेल्या भाजपत प्रवेशाबाबतच्या अफवा फेटाळल्या आहेत. मी सभागृहात केवळ भाजपच्या लोकांवर भाष्य करताना त्यांची मस्करी करण्यासाठी संघाची प्रतिज्ञा म्हणून दाखवली. पण काही लोकांनी त्याचा राजकीयदृष्ट्या गैरवापर करत गोंधळ निर्माण केला. जर कोणी माझ्या या कृत्यामुळं दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागतो"

DK Shivkumar
Prakash Ambedkar: आंबेडकर जरांगेंवर पुन्हा बरसले! म्हणाले, संधी होती तेव्हा पाणी फिरलं आणि आता लढ्याची भाषा करताय

गांधी कुटुंबावर कोणीही प्रश्न उपस्थित करु शकत नाही. मी काँग्रेसी म्हणूनच जन्माला आलो आहे तसंच मी काँग्रेसी म्हणूनच मरणार आहे. माझे काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांमध्ये अनेक मित्र आहेत. पण त्यामुळं मी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा माझा कुठलाही विचार नाही.

DK Shivkumar
Ashok Chavan News : लातूरची रेल्वे तुम्ही नांदेडला येऊ दिली नाही, पण आम्ही तसे करणार नाही! अशोक चव्हाणांचा टोला..

नेमका वाद काय?

गेल्या आठवड्यात कर्नाटक विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार आर. अशोक यांनी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीवरुन जोरदार टीका केली होती. सरकारवरील टीकेला उत्तर देताना शिवकुमार यांनी भर सभागृहात त्यांना डिवचण्यासाठी संघाची प्रतिज्ञा 'नमस्ते सदावत्सले मातृभूमे' म्हणून दाखवलं. त्यांच्या या विधानाची व्हिडिओ क्लीप नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. माध्यमांनीही याच क्लीपवरुन बातम्याही केल्या. पण याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं लक्षात येताच, शिवकुमार यांनी माझं रक्त आणि जीवन हे फक्त काँग्रेसच असल्याचं म्हटलं होतं. तसंच कर्नाटकात पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सांगितलं.

DK Shivkumar
Dombivli News: बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला काही तास उरले असतानाच डोंबिवलीकरांवर आलं विघ्न!

दरम्यान, यावरुन कर्नाटकातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी सोमवारी शिवकुमार यांनी एखाद्याला इम्प्रेस करण्यासाठी एरएसएसची प्रतिज्ञा भर विधानसभेत म्हणून दाखवली. आमचा शिवकुमार यांच्यावर कुठलाही आक्षेप नाही. कारण सरकार सर्वांचंच आहे. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी हे कृत्यू केल्यानं त्यांनी माफी मागितली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com