Maratha Aandolan : जरांगेंना मोठा झटका! हायकोर्टानं आझाद मैदानात आंदोलनासाठी केली मनाई कारण...; याचिकाकर्त्यांनाही फटकारलं

Maratha Aandolan : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे.
Manoj Jarange Patil Mumbai High Court
Manoj Jarange Patil Mumbai High CourtSarkarnama
Published on
Updated on

Maratha Aandolan : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली होती. या ठिकाणी ते आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी राज्यभरातील सर्व आंदोलकांना आझाद मैदानात येण्याचं आवाहन केलं होतं. पण आता जरांगेंना मुंबई हायकोर्टानं झटका दिला आहे. पोलीस प्रशासानानं परवानगी दिली नसल्यानं आझाद मैदानात आंदोलनासाठी कोर्टानं जरांगेंना मनाई केली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्ते अॅमी फाऊंडेशनला देखील हायकोर्टानं फटकारलं आहे.

Manoj Jarange Patil Mumbai High Court
Prakash Ambedkar: आंबेडकर जरांगेंवर पुन्हा बरसले! म्हणाले, संधी होती तेव्हा पाणी फिरलं आणि आता लढ्याची भाषा करताय

हायकोर्टानं नेमकं काय म्हटलं?

जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांना शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आझाद मैदानात परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही. जरांगेंना जर परवानगी मिळाली तर मात्र ते आझाद मैदानात शांततेत आंदोलन करु शकतात. तर दुसरीकडं गणपती उत्सवादरम्यान, अशा प्रकारच्या आंदोलनांमुळं मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळं कायदा-सुव्यवस्थेवर ताण येईल. त्यामुळं खारघर इथं जरांगेंना उपोषणासाठी पर्यायी मैदान उपलब्ध करुन देता येईल, असं सरकारी वकिलांनी यावेळी सरकारची बाजू मांडताना सांगितलं.

Manoj Jarange Patil Mumbai High Court
वर्धा जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करणारे अन् आता भंडाऱ्याचं पालकत्व स्वीकारलेले पंकज भोयर कोण?

दरम्यान, याचिकाकर्ते अॅमी फाऊंडेशनला यावेळी हायकोर्टानं फटकारलं, कोर्टानं म्हटलं की, तुम्ही दाखल केलेल्या याचिकेत जरांगेंना पक्षकार करण्यात आलेलं नाही. त्यामुळं त्यांना जोपर्यंत या याचिकेत पक्षकार केलं जात नाही तोपर्यंत आम्ही या याचिकेचा विचार करणार नाही. पण तरीही तुम्ही अशाच पद्धतीनं युक्तीवाद करत राहिलात तर आम्ही तुमची याचिका फेटाळून लावू, अशा शब्दांत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारलं.

Manoj Jarange Patil Mumbai High Court
Ashok Chavan News : लातूरची रेल्वे तुम्ही नांदेडला येऊ दिली नाही, पण आम्ही तसे करणार नाही! अशोक चव्हाणांचा टोला..

तरीही जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार

आता एकीकडं हायकोर्टानं परवानगी नसल्यानं आझाद मैदानात आंदोलनाला मनाई केली आहे. तर दुसरीकडं मनोज जरागें यांनी आंतरवली सराटीतून सांगितलं की, हायकोर्टानं आम्हाला परवानगी नाकारलेली नाही, उलट हायकोर्ट आम्हाला परवानगी देईल, याबाबत आमचे वकील अजूनही प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आम्ही उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळीच मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहोत.

Manoj Jarange Patil Mumbai High Court
Prakash Ambedkar: आंबेडकर जरांगेंवर पुन्हा बरसले! म्हणाले, संधी होती तेव्हा पाणी फिरलं आणि आता लढ्याची भाषा करताय

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काय सांगितलं?

जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या अॅमी फाऊंडेशनचे वकील महेंद्र रत्ना यांनी सांगितलं की, या याचिकेत आमच्या मूळ मागणी अशी आहे की त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. पण त्यांचं आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानात होणार आहे, ते खूपच गर्दीचं ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळी खूप मोठ्या प्रमाणावर लोक कामाला येतात कारण इथेच मंत्रालय आहे, हायकोर्ट आहे. हॉस्पिटल्स आहेत, तसंच बरीच इतर कार्यालये आहेत.

हा भाग व्यावसायिक भाग असल्यानं या ठिकाणी खूपच गर्दी असते. त्यामुळं आझाद मैदानाची जागा छोटी असून इथं आंदोलनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या ही लाखांवर असेल. या आंदोलकांच्या १०-१५ लाख गाड्याच इथं आल्या तर मुंबईतल्या लोकांच्या जगण्याचा अधिकारावर परिणाम होतो. त्यामुळं आम्ही मागणी केली होती की त्यांना पर्यायी जागा देण्यात यावी, जिथं त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

Manoj Jarange Patil Mumbai High Court
Jagdeep Dhankhar News : जगदीप धनखड यांची लेक दररोज येतेय दिल्लीत; जयपूरमध्ये कमर्शियल बिल्डींगची उभारणी, माजी उपराष्ट्रपतींच्या घरातील अपडेट समोर...

सरकारी वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

सरकारच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आलं की, आज महाराष्ट्र पोलिसांकडून एक गॅझेट नोटिफिकेशन काढलं जाणार आहे, त्यानुसार या आंदोलकांना त्यानुसार नव्यानं एक अर्ज सादर करावा. तसंच इथं सर्व नियमांचं पालन केलं जाईल असं संमतीपत्रही द्याव. तसंच पोलिसांना अधिकार देण्यात आले आहेत की, आंदोलक सर्वजण पुरतील अशी जागा त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी. त्यामुळं मुंबईतल्या रोजचा प्रवास करणाऱ्या त्रास होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com