Donald Trump : ट्रम्प यांनी आता मर्यादा सोडली; भारताबाबत वापरले संतापजनक शब्द

Donald Trump’s Latest Social Media Post on Russia-India Economy : डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. रशिया-भारताची अर्थव्यवस्था मृत असून ते एकत्रितपणे ती आणखी खाली नेऊ शकतात.
Donald Trump, Narendra Modi
Donald Trump, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Donald Trump Russia India talk : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आपणच थांबविल्याचे सातत्याने ठासून सांगणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मर्यादा सोडली आहे. त्यांनी बुधवारीच भारतावर तब्बल 25 टक्के आयातुशुल्क लादत मोठा धक्का दिला होता. आता सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी संतापजनक विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्यासाठी जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नसल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी आपण संघर्ष थांबवायला सांगितल्याचा दावा पुन्हा केला होता. त्यानंतर बुधवारी 25 टक्के टॅरिफचा झटका दिला.

आता गुरूवारी ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख मृत अर्थव्यवस्था असा केला आहे. खरेतर जगात भारतीय अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची आहे. पुढील काही वर्षांतच तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे. पण त्यानंतरही ट्रम्प यांनी मृत अर्थव्यवस्था म्हणत भारताला कमी लेखत डिवचले आहे.

Donald Trump, Narendra Modi
Sanjay Raut in Rajya Sabha : नेहरू तर महान, पण सरदार पटेल यांना पंतप्रधान न बनवून..! राऊतांचा राज्यसभेत जोरदार प्रहार

ट्रम्प यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत रशियासोबत काय करत आहे, याची मला पर्वा नाही. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मृत असून ते एकत्रितपणे ती आणखी खाली नेऊ शकतात. आम्ही भारतासोबत अत्यंत कमी व्यापार केला आहे. त्यांचे टॅरिफ जगात सर्वाधिक आहे. तर रशिया आणि अमेरिकेदरम्यान जवळपास काहीच व्यापार नाही.

ट्रम्प यांनी रशियाच्या माजी राष्ट्रपतींवरही निशाणा साधला आहे. रशियाचे असफल माजी राष्ट्रपती मेदवेदेव यांना ते अजूनही राष्ट्रपती आहेत असे वाटते. त्यांना सांगा की, आपल्या शब्दांवर त्यांनी लक्ष द्यावे. कारण ते खूप धोकादायक क्षेत्रात प्रवेश करत आहेत, अशा इशाराच ट्रम्प यांनी मेदवेदेव यांना दिला आहे.

Donald Trump, Narendra Modi
Donald Trump: अधिवेशन सुरु असतानाच ट्रम्प यांचा भारतावर सर्वात मोठा स्ट्राईक! 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लागू

भारताची भूमिका

ट्रम्प यांनी भारतावर ट्ररिफ बॉम्ब टाकल्यानंतर भारतानेही बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियासोबत व्यापार करण्यावरूनही अमेरिकेने दंड आकारण्याची धमकी दिली आहे. त्यावर बोलताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, भारत आणि अमेरिकेदरम्यान काही महिन्यांपासून एक निष्पक्ष, सतुलित आणि परस्परपुरक द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी चर्चा सुरू आहे. शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईच्या हितांचे रक्षण करण्यासाठी निर्यायक पावले टाकण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचेही सरकारने म्हटले आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com