
Teriff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या मुद्यावर संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. त्यातून युरोपियन देशही सुटले नाहीत. अनेक देशांनी आता ट्रम्प यांच्या गाठीभेटी घेण्यास, त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया यांनीही गुरूवारी (ता. 17) ट्रम्प यांची भेट घेत विविध मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
जॉर्जिया मेलोनी यांनी गुरूवारी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांच्यासोबत व्यापार तसेच इतर काही मुद्द्यांवर संवाद साधला. त्यानंतर या दोघांनीही मीडियासमोर आपआपली भूमिका मांडली. यादरम्यान एका पत्रकाराने ट्रम्प यांनी युरोपियन देशांना पॅरासाईट म्हणजे परजीवी म्हटल्याचा मुद्दा काढला. या विधानावर तुम्ही ठाम आहात का, असे पत्रकाराने विचारताच मेलोनी ट्रम्प यांच्या बचावासाठी आल्या.
ट्रम्प असे काही म्हटले नसतील, असे भाव चेहऱ्यावर आणत त्यांनी ट्रम्प यांनाच तुम्ही असे काही म्हटला होता का, असा प्रश्न केला. ते असं बोलले नाहीत, असे स्पष्टही केले. त्यावर ट्रम्प यांनीही लगेच मी असं काही म्हणालो होतो? नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय, हेही मला माहिती नाही, असे उत्तर देत प्रश्न टोलवून नेला. ट्रम्प यांच्या उत्तराने मात्र त्या खळखळून हसल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी यावेळी युरोपियन संघासोबत व्यापार समझोता शंभर टक्के होईल, असे आश्वासनही दिले. त्यामुळे ट्रम्प हे मेलोनी यांच्यासमोर नरमल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी आपण गडबड करणार नाही, असेही स्पष्ट केले. अमेरिकेने युरोपीयन संघातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 20 टक्के टेरिफ लावले आहे. त्यानंतर मेलोनी या ट्रम्प यांची भेट घेणाऱ्या पहिल्या नेत्या ठरल्या आहेत.
ट्रम्प यांनी युरोपातील 27 देशांसोबत समझोता करण्याबाबत सकारात्मक भाष्य केले आहे. पण अमेरिकेला नुकसान होईल, असा कोणताही समझोता स्वीकारण्यात येणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. प्रत्येकाला समझोता करायचा आहे. ज्यांना समझोता करावासा वाटत नाही, त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.