Trump Iran Deal : हा विकेंड संपूर्ण जगासाठी दिलासादायक ठरणार; पेट्रोल-डिझेलही स्वस्त होणार..., ट्रम्प यांची युद्धबंदीबाबत मोठी घोषणा

Trump announces possible Iran peace deal: व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव आणि संघर्ष संपवण्यासाठी ऐतिहासिक कराराचे दस्तऐवज तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
Trump says Iran agreement could be signed soon
Trump says Iran agreement could be signed soonSarkarnama
Published on
Updated on

Strait of Hormuz reopening and oil market impact:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष मिटविण्यासाठीचा महत्त्वपूर्ण करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या काही दिवसांत या कराराला अंतिम स्वरूप मिळू शकते, असा दावा केला आहे.

या आठवड्याअखेर किंवा सोमवारी युरोपमध्ये या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव आणि संघर्ष संपवण्यासाठी ऐतिहासिक कराराचे दस्तऐवज तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

इराणदेखील या करारासाठी उत्सुक असून दोन्ही देशांमधील तणाव संपवण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरेल. या करारामुळे मध्यपूर्वेत शांतता निर्माण होईल आणि तिथला संघर्ष संपण्याची शक्यता आहे.' तर या कराराचा परिणाम जागतिक व्यापारावरही होईल, कारण करारावर सह्या होताच स्ट्रेट ऑफ होर्मुज सामुद्रधुनी जहाजवाहतुकीसाठी तात्काळ खुली केली जाईल, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

Trump says Iran agreement could be signed soon
Mohan Bhagwat Attack : मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवर तुफान दगडफेक; त्यांच्याच डब्याच्या काचा फुटल्या

त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावरील तेलवाहतूक या मार्गाने होत असल्याने आणि सध्या इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली असल्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. कारण हा करार झाल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. दरम्यान, इराणच्या निमसरकारी फार्स समाचार एजेंसीनुसार, इराणच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रस्तावित करारावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Trump says Iran agreement could be signed soon
Child Marriage Crisis : धक्कादायक वास्तव! 55 ‘बालमाता’, बालविवाह रोखा, महिला आयोगाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

मात्र, अमेरिकेने इराणने सुचविलेल्या प्रमुख मसुद्याला मान्यता दिल्यानंतर या कराराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही या संभाव्य कराराबाबत ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती आहे.

इस्रायली पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, अंतिम करारात इराणकडील संवर्धित अणुसाहित्य हटविणे, अणुसंवर्धनाशी संबंधित पायाभूत सुविधा नष्ट करणे, क्षेपणास्त्र निर्मितीवर निर्बंध आणणे आणि प्रादेशिक दहशतवादी गटांना दिला जाणारा पाठिंबा थांबविणे यांसारख्या अटींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

लष्करी कारवाई रद्द

दरम्यान, यापूर्वीच ट्रम्प यांनी इराणविरुद्धची नियोजित लष्करी कारवाई रद्द केल्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावरून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. इराणसोबतच्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि इराणी नेतृत्वाने त्यास मान्यता देण्याची तयारी दर्शवल्यानंतर अमेरिकेने नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्बहल्ले रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com