Mohan Bhagwat Attack : मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवर तुफान दगडफेक; त्यांच्याच डब्याच्या काचा फुटल्या

Shatabdi Express Stone Pelting : उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ७.१५ ते ७.२० वाजण्याच्या दरम्यान घडली. अज्ञात व्यक्तींनी अचानक रेल्वेवर दगडफेक केल्यामुळे काही डब्यांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
RSS chief Mohan Bhagwat
Security officials inspect the damaged coach of the Swarna Shatabdi Express after a stone-pelting incident in Firozabad. RSS chief Mohan Bhagwat, who was traveling on the train, remained safe.Sarkarnama
Published on
Updated on

Mohan Bhagwat Train Attack : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.११) सायंकाळी लखनऊ-नवी दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवर काही अज्ञातांनी तुफान दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत होते.

सुदैवाने, या घटनेत मोहन भागवत पूर्णपणे सुरक्षित असून रेल्वेतील इतर प्रवाशांना देखील कोणतीही दुखापत न झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दगडफेकीत रेल्वेच्या एका डब्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रशासनमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ७.१५ ते ७.२० वाजण्याच्या दरम्यान घडली. अज्ञात व्यक्तींनी अचानक रेल्वेवर दगडफेक केल्यामुळे काही डब्यांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

RSS chief Mohan Bhagwat
MPSC Exam : धक्कादायक! वेळेआधीच उघडली जाते MPSC ची प्रश्नपत्रिका? नव्या दाव्यांमुळे खळबळ, एका चुकीच्या नियमामुळे…

नेमकी कुठे घडली घटना?

स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस कानपूरहून दिल्लीकडे जात असताना फिरोजाबाद रेल्वे विभागातील मक्खनपूर स्थानक पार केल्यानंतर रसूलपूर आणि दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेमेश्वर गेटजवळ अचानक ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकी दरम्यान एक मोठा दगड थेट एक्झिक्युटिव्ह क्लासच्या E-1 डब्याच्या खिडकीवर आदळल्याने सीट क्रमांक ५० जवळील बाहेरील काच पूर्णपणे तुटली.

नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचालक भागवत हे याच डब्यातील सीट क्रमांक ३९ आणि ४० वर बसले होते. मात्र ते डब्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. दगडफेकीच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन तातडीने टुंडला जंक्शनच्या आऊटरजवळ थांबवण्यात आली.

RSS chief Mohan Bhagwat
Child Marriage Crisis : धक्कादायक वास्तव! 55 ‘बालमाता’, बालविवाह रोखा, महिला आयोगाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत डब्याची पाहणी केली आणि प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री केल्यानंतर २० मिनिटांच्या तपासणीनंतर रेल्वे दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आली. मात्र, ही घटना अचानक घडली की आधीच नियोजित होती. भागवत असलेल्या डब्यावरतीच नेमकी दगडफेक कशी झाली? असे विविध प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com