Barsu Refinery : बारसुच्या वादात आंबेडकरांची उडी ; मुख्यमंत्र्यांना करुन दिली अंतुलेंची आठवण, म्हणाले, ..त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात..

Prakash Ambedkars ON Eknath Shinde : कोकणाची वाट लावू नका...
Eknath Shinde, Prakash Ambedkar
Eknath Shinde, Prakash Ambedkarsarkarnama

Prakash Ambedkars Appeal to cm Eknath Shinde : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन स्थानिक नागरिक आणि सत्ताधारी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांनी आंदोलन केले होते. . (Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar’s oppose to refinery at Barsu)

हे आंदोलन स्थगित झाले असले तरी त्यावरुन वाद-प्रतिवाद सुरुच आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या प्रकल्पाला विरोध केल्याने ठाकरे गट विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा संघर्ष पेटला आहे

या संघर्षात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी उडी घेतली आहे. त्यांनी बारसू रिफायनरीला विरोध केला आहे. आंबेडकरांनी टि्वट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे. आज (रविवार) त्यांनी टि्वट करीत बारसू रिफायनरीला आमचा विरोध असल्याचे म्हटलं आहे.

Eknath Shinde, Prakash Ambedkar
Maratha reservation News : मराठा आरक्षण वनवास यात्रा उधळणार ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

कोकणात ९५% शुद्ध ऑक्सिजन आहे. इथलं वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राणी इथे जन्माला येतात. त्यामुळे ही शुद्धता टिकली पाहिजे. असे आवाहन आंबेडकरांनी शिंदेंना केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोकणाची वाट लावू नका, असे आवाहन केले आहे. त्यासोबतच एन्रॉनला घालवण्यात आमची महत्त्वाची भूमिका होती, याचीही आठवण मुख्यमंत्री शिंदेंना करुन दिली आहे.

Eknath Shinde, Prakash Ambedkar
Karnataka Election : BJP उमेदवाराची JDS च्या उमेदवाराला धमकी ; Audio Clip व्हायरल ; अर्ज मागे घ्या, अन्यथा..

"काही उद्योग आणण्यापेक्षा इथल्या नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्यांच्याशी संबंधित कोकणी माणसाच्या उद्योगांना चालना दिली तर तेलंगणाप्रमाणेच इथल्या माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते," असे आंबेडकरांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर..

  • बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनला घालवण्यातही आमची मोठी भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की कोकणाची वाट लावू नका. कोकणात आजही ९५% शुध्द ऑक्सिजन आहे. इथलं वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राणी इथे नव्याने जन्माला येतात.

  • कोकणातील लोकांच्या जगण्याचा प्रश्न देखील या निसर्गसंपन्नतेतून सोडवता येऊ शकतो. कोकणाचा कॅलिफोर्निया होऊ शकतो, त्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. अॅड. आंबेडकार ट्विटमध्ये पुढे म्हणाले, मी सर्वांना आठवण करुन देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, पूर्णवेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करु शकतो. ते खोटं नव्हतं. परंतू जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला, त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com