Lok Sabha Session Live : धक्कादायक : लोकसभेत अध्यक्षांसमोर खासदार काढतोय ई-सिगारेटचा ‘धूर’; जोरदार गदारोळ, कारवाई होणार?

Lok Sabha e-cigarette allegation : केंद्र सरकारने २०१९ मध्ये ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. युवक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्य ई-सिगारेटचा वापर वाढल्याने त्यावर बंदी घालण्यात आली.
Parliament controversy India
Parliament controversy IndiaSarkarnama
Published on
Updated on

Political news India : केंद्र सरकारने देशभरात ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. त्याचा वापर केल्यास तो गुन्हा ठरतो आणि कायद्यानुसार शिक्षाही होऊ शकतो. मात्र, बेकायदेशीरपणे त्याचा वापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता धक्कादायक बाब म्हणजे लोकसभेच्या सभागृहात खासदारांकडूनच ई-सिगारेटचा वापर होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करताना कोणत्याही खासदाराचे नाव घेतले नाही. मात्र राजकीय पक्षाचे नाव घेत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांकडून ई-सिगारेट ओढली जात असल्याचा दावा केला आहे.

अनुराग ठाकूर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, देशभरात ई-सिगारेटवर बंदी आहे. पण अध्यक्षांनी लोकसभेत त्यासाठी परवानगी दिली आहे का, असा सवाल ठाकूर यांनी केला. त्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अशी कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. भाजपच्या खासदारांनी संबंधित खासदारांवर कारवाईची मागणी केली.

Parliament controversy India
Amit Shah Vs Uddhav Thackeray : अमित शहांचा ठाकरेंवर दिल्लीतून वार; महाराष्ट्रात पडसाद, CM म्हणाले, कोण होतास तू...

संसदकडे देशाच्या कोट्यवधी लोक आशेने बघतात. त्यामुळे इथे संसदेच्या परंपरेला धक्का बसेल, असे कोणतेही आचरण होता कामा नये. या मुद्द्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. गरज असेल तर चौकशी करायला हवी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा होणार नाही, अशी मागणी अनुराग ठाकूर यांनी केली.

ठाकूर यांच्या मागणीनंतर बिर्ला यांनी कोणत्याही सदस्याला विशेषाधिकार दिला गेलेला नसल्याचे सांगितले. याबाबत लेखी तक्रार आल्यानंतर आपण नियमानुसार कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. संसद हे लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. इथे बसणाऱ्या सर्व प्रतिनिधींवर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे संसदेची प्रतिष्ठा जपली पाहिजे, असे बिर्ला यांनी सदस्यांना सुनावले.

Parliament controversy India
Bajrang Sonawane : तुम्हाला तुमच्या नेत्यांची जागा घ्यायची आहे का? बजरंग सोनवणेंना थेट लोकसभा अध्यक्षांचाच सवाल, त्या अडीच मिनिटांत काय घडलं?

दरम्यान, केंद्र सरकारने २०१९ मध्ये ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. युवक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्य ई-सिगारेटचा वापर वाढल्याने त्यावर बंदी घालण्यात आली. ई-सिगारेट म्हणजे एक बॅटरीवर चालणारे इलेक्टॉनिक उपकरण आहे. आतमध्ये निकोटीनचा थर असतो. त्याचे रुपांतर वाफेमध्ये किंवा धूरामध्ये होते. ई-सिगारेटचा वापर इतर सिगारेटप्रमाणेच घातक असतो.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com