WB election update : IPS अधिकाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओने गाजलेली निवडणूक; आयोगानं उचललं महत्वपूर्ण पाऊल

Falta repoll 2026, ECI fresh polling order : बंगालमधील डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघातील १५ मतदान केंद्रांवरही पुन्हा मतदान होणार आहे.
West Bengal election news update TMC vs BJP
West Bengal election news update TMC vs BJPSarkarnama
Published on
Updated on

Election Commission India update : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. संपूर्ण देशाचं निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे. सर्वाधिक अटीतटीची लढत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने एका मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याचे आदेश काढले आहे.

बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडला. यंदा मतदारांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित काढत छप्परफाड मतदान केले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेससह भाजपने आपलीच सत्ता येणार, असा दावा केला आहे. बहुतेक एक्झिट पोलमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

मतदानादरम्यान काही मतदारसंघांमध्ये हिंसेच्या घटना घडल्या होत्या. मतदान केंद्रांवरही काही अनुचित प्रकार घडले होते. प्रामुख्याने फाल्टा मतदारसंघात मतदानाआधीपासून प्रशासन अन् तृणमूल काँग्रेसमधील वाद प्रकर्षाने समोर आला होता. त्यानंतर आता आयोगाने या मतदारसंघातील सर्व २८५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदानाची घोषणा केली आहे.

West Bengal election news update TMC vs BJP
Assembly Election Result : टपाली मतांची तीन वर्षांनंतर पुन्हा मोजणी; काँग्रेस आमदाराला धक्का, भाजपच्या पराभूत उमेदवाराने मारली बाजी...

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, फाल्टा मतदारसंघात २१ मे रोजी पुन्हा मतदान होईल. तर निवडणुकीची मतमोजणी २४ मे रोजी होईल. या मतदारसंघात २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानदरम्यान अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत अडथळे आणण्यात आल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बंगालमधील डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघातील १५ मतदान केंद्रांवरही पुन्हा मतदान होणार आहे. त्यामुळे आता तीन मतदारसंघातील निकालासाठी २४ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तर उर्वरित सर्व मतदारसंघाची मतमोजणी सोमवारीच पार पडेल.

West Bengal election news update TMC vs BJP
Teena Choudhry viral video : भाजपच्या मोर्चात जोरदार राडा, 'ती' महिला आली समोर; म्हणाल्या, गिरीश महाजनांनी...

काय घडलं फाल्टामध्ये?

फाल्टा विधानसभा मतदारसंघात जहांगीर खान हे टीएमसीचे उमेदवार आहे. प्रचारदरम्यान मतदारांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मतदारांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने पोलीस पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलेले आयपीएस अधिकारी अजयपाल शर्मा यांचा धमकावणाऱ्यांना इशारा देणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अजयपाल यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जहांगरी यांनी प्रत्युत्तर दिले होते. हा वाद चांगलाच वाढला होता. त्यानंतर मतदानादिवशीही अनेक मतदान केंद्रावर हिंसा आणि मतदारांना धमकावल्याचे, मतदान करू न दिल्याचे प्रकार घडले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com