

BJP vs Congress news : देशभरातील विविध निवडणुकांमध्ये काही उमेदवार अगदी कमी मतांनी विजयी होतात. मग पराभूत उमेदवारांकडून निवडणूक याचिका दाखल करून पुन्हा मतमोजणीची किंवा विजयी उमेदवारावर गंभीर आरोप करत निवडच रद्द करण्याची मागणी केली जाते. अशाच एका याचिकेनंतर एका विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांची तब्बल तीन वर्षांनंतर मोजणी झाली अन् विजयी उमेदवाराची मते कमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
कर्नाटकातील श्रृंगेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत हा प्रकार घडला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर टपाली मतांची मोजणी सुरू करण्यात आली होती. रविवारी पहाटे याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. या मतदारसंघातून २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे टी. डी. राजेगौडा हे केवळ २०१ मतांनी विजयी झाले आहेत.पुन्हा झालेल्या मतमोजणीमध्ये त्यांची मते कमी झाली असून भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा दावा केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये एकूण १८२२ टपाली मतांची मोजणी करण्यात आली होती. त्यामध्ये जीवराज यांना ६९२ तर राजेगौडा यांना ५६९ मते मिळाली होती. आज पुन्हा मोजणी करण्यात आलेल्या वैध मतांपैकी राजेगौडा यांना पडलेली २५५ मते अवैध ठरविण्यात आली आहेत. तर भाजपचे उमेदवार डी. एन. जीवराज यांना मिळालेली दोन मतेही अवैधत घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे जीवराज यांची मते ६९० झाली तर राजेगौरा यांचा मतांचा आकडा ३१४ पर्यंत खाली आला.
पुन्हा मतमोजणीनंतर भाजपने जीवराज यांचा 65 मतांनी विजय झाला असल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप निवडणूक आयोगाकडून याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानंतर पुन्हा मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर टपाली मते पुन्हा स्टाँग रूमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. पुनर्मोजणीच्या माहितीची अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मीडियाशी बोलताना जीवराज म्हणाले, ‘माझ्या मतांचा आकडा वाढला असून राजेगौडा यांची मते कमी झाली आहेत. तरीही अद्याप मला विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. अधिकारी काय भूमिका घेतायेत, हे आम्ही पाहतोय.’ राजगौडा यांनी मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप केला. काही मतपत्रिकांवर रेषा आढळून आल्या. हे कसे झाले माहिती नाही. २०२३ मध्ये सर्वपक्षीय एजंट असताना झालेल्या मोजणीवेळी ती वैध ठरविण्यात आली होती. आता माझीच मते अवैध ठऱविण्यात आली, असे राजेगौडा यांनी म्हटले आहे. आता राजेगौडा यांच्या मार्फत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.