

Maharashtra News : मुंबईतील भाजपच्या महिला मोर्चामुळे २१ एप्रिलला वरळी भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने एक महिला चांगलीच संतापली होती. आपल्या लेकीला सोडून घरी निघालेल्या या महिलेने आपला राग मोर्चासाठी बंदोबस्तवर असलेल्यो पोलिसांसह मोर्चात सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही काढला होता. या महिला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर ही महिला नेमकी कोण, यावरून बरीच चर्चा रंगली होती. अखेर पहिल्यांदाच ती महिला समोर आली आहे.
टीना चौधरी असे या महिलेचे नाव असून त्यांनी शनिवारी व्हिडीओच्या माध्यमातून त्यादिवशी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली. तसेच राजकीय पक्षांनाही त्यांनी बजावलं आहे. टीना चौधरी यांनी सांगतिल्याप्रमाणे, त्या आपल्या लेकीला संगीत क्लासला सोडून परत निघाल्या होत्या. मात्र, वाहतुक कोंडीमुळे सुरूवातीला जवळपास २५ मिनिटे त्यांची कार अडकली. वाहने पुढे सरकत नसल्याने त्यांनी कारमधून उतरून पाहिले.
याबाबत सांगताना चौधरी यांनी म्हटले आहे की, कारसमोर बस उभ्या होत्या. त्यानंतर पुढचे दीड तास पोलिसांना बस हटविण्यासाठी सांगत होते. पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. घरी पोहचण्याबाबत काहीच अंदाज नव्हता. गिरीश महाजन यांनी किमान माझे ऐकून घेतले. त्यांनी सांगितल्यानंतर दोन बस बाजूला केल्याने आम्हाला यू टर्न घेऊन जाता आले.
आंदोलकांवर पाण्याची बाटली फेकल्याच्या मुद्द्यावरही चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले. आपण कोणाच्याही अंगावर बाटली फेकली नाही. आपल्या म्हणण्याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर बाटली फेकल्याचे त्या म्हणाल्या. तसेच त्यादिवशीच्या घटनेनंतर इतर राजकीय पक्षांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यावरूनही चौधरी यांनी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवऊन निशाणा साधू नका, असे आवाहन करत अशा घटनांसाठी सर्वच राजकीय पक्ष कारणीभूत असल्याचे सांगत कानही उपटले.
आपल्या कुटुंबातील वडील, आजोबांसह आठ लोकांनी लष्करात सेवा दिल्याचेही चौधरी यांनी सांगितले. अंगावर एखादी वर्दी घातल्यानंतर तु्ही लोकांच्या सेवेसाठी असता, असे सांगत चौधरी यांनी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याबद्दल अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केली. पहिल्यांदाच व्हिडीओतून आपली भूमिका स्पष्ट करणाऱ्या टीना चौधरी यांनी आपल्याला समर्थन करणाऱ्या लोकांचेही आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.