Mamata Banerjee : ममतांच्या वर्चस्वाला पहिला धक्का; अत्यंत विश्वासू मंत्री गजाआड

शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांना अटक.
West Bengal CM Mamata Banerjee News, Partha Chatterjee News
West Bengal CM Mamata Banerjee News, Partha Chatterjee NewsSarkarnama
Published on
Updated on

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या वर्चस्वाला पहिला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे मंत्रिमंडळातील अत्यंत विश्वासू मंत्री व मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेले नेते पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांना सक्तवसूली संचालनालयाने शनिवारी रात्री अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बंगालमध्ये ममतांची सत्ता आल्यानंतर त्यांच्यासाठी सर्वात मोठा झटका मानला जात आहे.

चॅटर्जी हे सध्या ममता सरकारमध्ये उद्योगमंत्री आहे. मागील सरकारमध्ये शिक्षणमंत्री असताना त्यांनी शिक्षक भरतीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून लावण्यात आला आहे. याचप्रकरणात ईडीने (ED) शुक्रवारी (२२ जुलै) केलेल्या या कारवाईत एक दोन नव्हे तर तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरात ही रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ईडीने त्यांनाही अटक केली आहे. (West Bengal SSC Scam)

West Bengal CM Mamata Banerjee News, Partha Chatterjee News
बाबो...! मंत्र्याच्या सहकाऱ्याच्या घरात वीस कोटींच घबाड: पैशाचा अक्षरश: ढिगाराच

चॅटर्जी हे तृणमूल काँग्रेसमधील बडे नेते असून सध्या महासचिव आहे. ममतांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्यावरच ईडीने कारवाई केल्याने ममतांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. चॅटर्जी यांना अटक करून ईडीने थेट ममतांच्या अडचणी वाढवल्याची जोरदार चर्चा बंगालच्या राजकारणात रंगली आहे.

दरम्यान, ईडीने शुक्रवारी केलेल्या या कारवाईनंतर अर्पिता मुखर्जी यांच्या घरात अक्षरशः पैशांचा ढीग लागला आहे. ईडीने 20 कोटींच्या रोख राकमेसह 20 मोबाईल, कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही जप्त केल्या आहेत. शुक्रवारी (२२ जुलै) ईडीने पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत जप्त करण्यात आलेली रोकड स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी संबधित असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

या प्रकरणी तपास करताना ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरीही छापेमारी केली असता ईडीच्या अधिकाऱ्यांना २० कोटींचे घबाड मिळाले. या कारवाईनंतर परिसराच एकच खळबळ उडाली होती. अर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखलं जातात. स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळा प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला हे प्रकरण सोपवलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com