Ranchi News : झारखंडमधील कथित जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांची टीम शनिवारी थेट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी पोहोचले. सातवेळा समन्स बजावूनही सोरेन चौकशीला हजर झाले नव्हते. त्यातच त्यांच्या अटकेची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता ईडीची टीम त्यांच्या घरी पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये (Jharkhand) राजकीय उलथापालथ होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सोरेन यांना ईडीकडून (ED) अटक होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री चौकशीला हजर राहत नसल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यातच एका आमदाराने अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी सोरेन (CM Hemant Soren) यांच्या पत्नी पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
ईडीने 13 जानेवारीला पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना 16 ते 20 जानेवारीदरम्यान चौकशी करण्यासाठी उपलब्ध राहण्यास सांगण्यात आले होते. त्याला उत्तर देताना सोरेन यांनी 20 तारखेला आपल्या घरी जबाब घेण्यासाठी यावे, असे कळवले होते. त्यानुसार आज ईडीची टीम त्यांच्या घरी आल्याचे समजते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, सोरेन यांच्या चौकशीआधी शुक्रवारी अनेक आदिवासी संघटनांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्याविरोधात मोर्चा काढला होता. पारंपरिक हत्यारे हातात घेऊन आदिवासी नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. आदिवासी मुख्यमंत्र्यांना त्रास देणे थांबवा, अशा आशयाचे फलकही त्यांनी घेतले होते. त्यामुळे शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सोरेन यांना मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पहिले समन्स पाठवण्यात आले होते. तेव्हापासून सातव्या समन्सपर्यंत सोरेन यांनी चौकशीला सातत्याने हुलकावणी दिली. अखेर ईडीने काही कायदेशीर प्रक्रियेचा उल्लेख करीत मुख्यमंत्र्यांना आठवे समन्स पाठवले. त्यानंतर सोरेन यांनी चौकशीची तयारी दर्शवली आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.