ED Raid : भाजपचा रडीचा डाव, ईडीचा धाडीत निवडणूक रणनीतीची कागदपत्र जप्त; ममता बॅनर्जींना धक्का!

ED Raid Mamata Banerjee Trinamool Congress : ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पक्षाच्या निवडणूक रणनीती संदर्भातील महत्त्वाची कागपत्र, हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

ED Raid News : आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी पहाटे सहा वाजता तृणमूल काँग्रेसेची रणनीती आखणारी संस्था आयपॅक आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली.

ईडीच्या धाडीनंतर ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि एक हिरव्या रंगाची फाइल घेऊन बाहेर पडल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप करत पक्षाचे निवडणूक रणनीती संदर्भातील सर्व डेटा जप्त केल्याचे सांगितले.

उमेदवारांच्या याद्या, हार्ड डिस्क, मोबाईल फोन, पक्षाच्या रणनीती संदर्भातील कागदपत्रे ईडीने सोबत नेले, असे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सांगितले. राजकीय पक्षांचा डेटा गोळा करणे हे ईडीचे काम आहे का?, असा सवाल देखील त्यांनी केला.

Mamata Banerjee
BJP News: भाजप आमदाराचा 'उद्योग'; बावनकुळेंच्या डोक्याला ताप; दोन सभांमध्ये बंडखोर उमेदवारांचा धुडगूस

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप रडीचा डाव खेळत आहे. भाजपच्या कार्यालयावर मी छापा टाकून त्यांच्या निवडणूक तयारीची कागदपत्रं जप्त केली तर काय होईल. निवडणुकीच्या नावावर माझ्या पक्षाशी संबंधित सर्व माहिती ते जमा करत आहेत. त्यासाठी रडीचा डाव खेळत आहेत.

थेट कार्यालयात घुसल्या...

ईडीच्या छाप्याची माहिती मिळताच ममता बॅनर्जी ह्या आयपॅकचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी व कार्यालयात पोहोचल्या. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आयपॅकच्या कार्यालयाकडे जाणार रस्ता बंद केला होता. मात्र, या यंत्रणांशी चर्चा न करता त्या थेट आतमध्ये गेल्या. इमारतीच्या तळघरातून त्या लिफ्टने थेट 11 व्या मजल्यावर गेल्या. तेथून त्यांनी फाइल्स घेत आपल्या कारमध्ये ठेवल्या.

Mamata Banerjee
Sharad Pawar News: निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांच्या माजी आमदाराला ह्दयविकाराचा झटका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com