IPS Controversy : खेळ तुम्ही सुरू केला, शेवट आम्ही करणार..! एन्काऊंटर स्पेशालिस्ट IPS अधिकाऱ्याला नेत्याकडून धमकी

IPS Ajay Pal Sharma row : टीएमसीने आरोप केला की, ‘पोलीस अधिकारी रात्रीच्यावेळी लोकांच्या घरात घुसून छापेमारी करत आहे. महिलांसोबत गैरवर्तन करत असून मतदारांमध्ये भीती निर्माण करत आहेत.’
IPS Ajay Pal Sharma row
IPS Ajay Pal Sharma row Sarkarnama
Published on
Updated on

West Bengal election controversy : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संपला. मतदानासाठी आता अवघे काही तास उरलेले असताना एका आयपीएस अधिकाऱ्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश केडरच्या या एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेला अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यूपीतील पोलीस अधिकारी अजय पाल शर्मा यांची बंगालमध्ये दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात पोलीस पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील फलता मतदारसंघाचे टीएमसीचे उमेदवार जहांगीर खान यांच्याकडून मतदारांना धमकावले जात असल्याच्या तक्रारी आल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

शर्मा यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची टीम सोमवारी खान यांच्या घरी पोहोचली होती. यावेळी शर्मा यांनी खान यांच्या कुटुंबाला कारवाईचा इशारा दिला होता. तुमच्या समर्थकांनी पुन्हा मतदारांना धमकावले तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावरून खान यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

IPS Ajay Pal Sharma row
Modi Government decision : अखेर मोदी सरकारकडून ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा; ममतादीदींच्या जुन्या सहकाऱ्यावर सोपविली अत्यंत महत्वाची कामगिरी

टीएमसीने आरोप केला की, ‘पोलीस अधिकारी रात्रीच्यावेळी लोकांच्या घरात घुसून छापेमारी करत आहे. महिलांसोबत गैरवर्तन करत असून मतदारांमध्ये भीती निर्माण करत आहेत.’ खान यांनीही प्रचाराच्या अखेच्या दिवशी एका सभेत शर्मा यांना धमकी दिली आहे. खेळ तुम्ही सुरू केलाय, शेवट आम्ही करू. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असे खान यांनी म्हटले आहे.

IPS Ajay Pal Sharma row
Raghav Chadha news : राघव चड्ढा यांच्याच विधेयकामुळे फिरला असता सगळा राजकीय डाव; खासदारकीसह भाजपमध्ये प्रवेश करणे झाले असते अशक्य...

आता तर खेळ सुरू झाला आहे. तुम्ही विचार करत असाल की, सीआरपीएफचे लोकांना सोबत घेऊन तुम्ही आम्हाला भीती दाखवाल. पण इथले लोक नुसते पायी चालत आले तरी तुम्ही हवेत उडून जाल. त्यामुळे भाजपच्या लोकांना तुम्हाला एवढेच सांगणे आहे की, इथे येऊन लोकांचा हा समुद्र पाहा. इथे एक-एक महिला माँ दुर्गा आहे. राक्षसांचा वध कसा करायचा हे त्यांना माहित आहे. तशाच प्रकारे भाजपला कशाप्रकारे टाईट करायचे, हेही त्यांना माहिती आहे, असा इशारा खानी यांनी दिला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com