Video Assembly Election : मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार, निवडणूक आयोग घोषणा करणार

Assembly Election Election commission : महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात जम्मू-काश्मीरमधील देखील निवडणूक यासोबत घेण्याच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, जम्मू काश्मीर राज्यातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल 8 नोव्हेंबरला संपत आहे. त्यात नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार की दिवाळीनंतर याची उत्सुकता असणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात जम्मू-काश्मीरमधील देखील निवडणूक यासोबत घेण्याच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत 14 ऑगस्ट रोजी बैठक घेतली होती. 9 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या टीमसह जम्मू काश्मीरला भेट दिली. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.

Election Commission
Video Vijay Wadettiwar : 'महाराष्ट्र गहाण ठेवला, विकायला कमी करणार नाहीत' लाडकी बहीण योजनेवरून विजय वड्डेटीवार कडाडले

महाराष्ट्राची निवडणूक दिवाळीनंतरच?

महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभेत चागंले यश मिळाले नाही. मात्र, लाडकी बहीण योजनेसह विविध योजना राज्य सरकारने घोषित केल्या आहेत. या योजना राबवण्यासाठी सरकारला पुरेस वेळ मिळावा,यासाठी निवडणूक दिवाळीनंतर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जम्मू कश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा तेथे मोठ्या प्रमाणात काम करतील. त्यामुळे जम्मू आणि हरियाणाची निवडणूक दिवाळीच्या आधी घेत दिवाळीनंतर महाराष्ट्राची निवडणूक घेण्याची शक्यता आहे.

एक देश एक निवडणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात सततच्या निवडणुकांमुळे विकास कामे करता येत नसल्याचे सांगितले होते. तसेच सर्व निवडणुका एकत्र घेण्याविषयी विचार असल्याचे जाहीर केले होते.

त्यामुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणूक देखील एकत्र घेण्यासाठी महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर, दिल्ली, झारखंड या राज्यांच्या एकत्र निवडणुका घेण्याची संधी निवडणूक आयोगाला असणार आहे.

Election Commission
Manoj Jarange News : मी राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल; मनोज जरांगेंचा थेट इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com