Video Vijay Wadettiwar : 'महाराष्ट्र गहाण ठेवला, विकायला कमी करणार नाहीत' लाडकी बहीण योजनेवरून विजय वड्डेटीवार कडाडले

Vijay Wadettiwar mazi ladki bahin yojana BJP NCP Shivsen : महायुतीत शामिल पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी 15 ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : लाकडी बहीण योजना विधानसभेत गेमचेंजर ठरेल, असा आत्मविश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे सरकार या योजनेचा जोरदार प्रचार करत आहेत. या योजनेचा पहिला हफ्ता देखील महिलांच्या खात्यात जमा झाला. मात्र, या योजनेच्या जाहिरातीवर होणाऱ्या खर्चावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

'जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र 199 कोटी 81 लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले.', असे ट्विट करत वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले.

'सरकाराने लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी 270 कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारसाठी तब्बल 119 कोटी 81 लाख खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे', असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत सरकार करत असेल्या खर्चावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.

Vijay Wadettiwar
Rajratna Ambedkar : भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार! आंबेडकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

स्वतःच्या हितासाठी राबणारे सरकार

सुट्टीच्या दिवशीच काय पण कामकाजाच्या दिवशी देखील सामन्या लोकांची कामे मंत्रालयात होत नाहीत. मात्र, महायुतीत शामिल पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी 15 ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वतःच्या हितासाठी राबणारे किती हे तत्पर सरकार, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र गहाण ठेवला

सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाही, पण स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातीसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे. येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही, असा आरोप आपल्या ट्विटमध्ये वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Wadettiwar
Lalu Prasad Yadav call Nitish Kumar : सत्ता वाचवण्यासाठी शेवटचे प्रयत्न, नितीश कुमारांना लालूंचा पाच वेळा फोन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com