
New Delhi News : भारतीय निवडणूक आयोगाने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ग्रामीण आणि शहरी भागांतील मतदारांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांच्या ऐनवेळी निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे.
भारत निवडणूक आयोगाचे (Election Commission) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू आणि डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग हे निर्णय घेतले गेले आहेत. तसेच मतदान प्रक्रिया कायदेशीर चौकटीत अधिकाधिक पारदर्शीपणे पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा देण्यावरही आयोगाकडून भर दिला जात आहे.याचमुळे आयोगाकडून वारंवार नवनवीन कल्पना राबवल्या जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानादिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करताना एक मोठं पाऊल उचललं आहे. आता मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा मतदारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच,निवडणूक प्रचारासाठीची नवी मर्यादाही निश्चित करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने घेतलेले संबंधित निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम,1951 आणि निवडणूक आचारसंहिता 1961 यांच्याशी निगडित आहेत.मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत स्विच ऑफ करुन मोबाईल नेण्यास मुभा असणार आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या जवळ मोबाईल ठेवण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
पण याचवेळी निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पण काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत अपवादात्मक निर्णय घेऊ शकतात. मात्र, मतदान (Voting) गुप्ततेचा नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक असणार आहे.
निवडणूक आयोगानं प्रचाराच्या संदर्भातही मोठा बदल केला आहे. यात मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचारास मनाई करण्यात आली आहे. मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या पलीकडे ठेवणे आता बंधनकारक असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.