
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (ता.23) दिवसभर कोल्हापूर दौऱ्यावर होते. माजी आमदार के पी पाटील यांचा पक्ष प्रवेश आटोपून ते पेठ वडगावकडे मार्गस्थ झाले. मात्र, वाटेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे घर असल्याने धावत्या दौऱ्यातही त्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाडिक यांच्या घरी भेट घेतल्यानंतर 'गोकुळ'च्या राजकारणात चांगली चर्चा उमटली.
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे कार्यक्रमानिमित्त जात असताना अजित पवार यांनी दुपारी चार वाजता वेळात वेळ काढून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी पवार यांनी महाडिक यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाडिक परिवाराच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते नामदार अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, पाच ते दहा मिनिटं उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागाव येथील माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadeo Mahadik) यांच्या घरी होते. अल्पोहार घेत घेत सहकारी कारखान्या संदर्भात चर्चा केली. शिवाय कर्नाटकातील बेडकी हाळ साखर कारखान्याबाबत माहिती जाणून घेतले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी देखील दिलखुलास चर्चा केली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत आपण आपल्या घरी आलो असल्याची आठवण देखील महाडिक यांना करून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढच्या दौऱ्यासाठी निघून गेले.
यावेळी आमदार अमल महाडिक,स्वरूप महाडिक, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्ले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक त्यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पण गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा न दिल्यानंतर गोकुळ दूध संघातील राजकारण तापले होते. मात्र, तीन दिवसांच्या नाट्यमय घडामोडी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या चर्चेनंतर अध्यक्ष अरुण डोंगळे यांची भूमिका मवाळ झाली.
अरुण डोंगळेंनी मुंबईतील सह्याद्री येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी गोकुळ दुधसंघाच्या अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी या संदर्भात कोणाशी बोलावे लागेल असे सांगितले होते. त्यावेळी आपण त्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बोट दाखवले असल्याचंही डोंगळेंनी सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.