
New Delhi News : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील व्हॅलीत 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. ज्यात 26 भारतीय पर्टकांना आपला जीव गमावला. यानंतर 7 मे रोजी रोजी भारतीय लष्काराने ऑपरेशन सिंदूरमधून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये घुसून 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. ज्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. या कारवाईनंतर तब्बल 20 दिवसानंतरही 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा नखभर कमी झालेली नाही. पण आता या ऑपरेशनच्या लोगोची चर्चा सुरू झाली असून तो कोणी बनवला? ती व्यक्ती कोण? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येत आहेत. दरम्यान आता याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) फक्त पुरूषांनाच लक्ष करण्यात आलं होतं. महिलांना आपला पती, घरातील कर्ता पुरूष तर मुलाबाळांना त्यांचा बाप गमवावा लागला होता. यानंतरच पंतप्रधान मोदींनी, महिलांनी त्यांचा सिंदूर गमावल्याने या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले होते. तर पंतप्रधान मोदींनीच नाव सूचवल्याने याचा लोगो बनवण्याचे ठरविण्यात आले होते. तर भारतीय संरक्षण मंत्रालयाने त्याच दिवशी पत्रकार परिषद घेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली होती.
'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा जगभर झाल्यानंतर आता लोगोबाबत चर्चा सुरू झाली आहे. या लोगोची जबाबदारी भारतीय लष्करातील दोन अधिकाऱ्यांवर देण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या लोगोचे श्रेय लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह यांना जात असून या दोघांनी लोगो आणि डिझाईन तयार केलं आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना 26 च्या बदल्यात 100 दहशतवाद्यांना भारताने मारले. ज्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्यांसह त्याच्या जवळच्या चार सहकाऱ्यांचाही यात समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.