

Emmanuel Macron Mumbai’s visit: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच चार दिवस भारत दौऱ्यावर होते. मुंबईमध्ये फ्रान्सच्या अध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक पार पडली.यात मॅक्रॉन आणि मोदी यांची मुंबईतील ऐतिहासिक भेट अनेक कारणांमुळे चर्चेची ठरली. मुंबईच्या दौऱ्यात परदेशी पाहुण्यासाठी खास मेनू ठेवण्यात आला होता. या मेनूचा आस्वाद घेत इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी मराठमोळ्या जेवण्याचे कौतुक केले.
मुंबईतील ‘लोकभवन’मध्ये या दिग्गज नेत्यांनी कोणत्या मराठी पदार्थांवर ताव मारला, यांची माहिती आता समोर आली आहे. महाराष्ट्राच्या अस्सल मराठी पदार्थांचा आनंद पंतप्रधानांसह त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने देखील घेतला. परदेशी पाहुण्यांच्या जिभेवर महाराष्ट्राच्या मातीतील चव कशी रेंगाळली हे जाणून घेऊया!
देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची उपस्थिती असलेल्या पंतप्रधानांच्या शिष्टमंडळासाठी लोकभवनातर्फे चक्क वडा पाव आणि झणझणीत मिसळ पाव यांचा समावेश करण्यात आला होता. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांना मुंबईचा वडा पावावर ताव मारला. फ्रान्सच्या शिष्टमंडळालाही मुंबईच्या या ‘ग्लोबल’ वडापावने अक्षरशः वेड लावले.
भरड धान्याला (मिलेट्स मिशन) प्रोत्साहन देण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी व त्यांच्या शिष्टमंडळासाठी नास्त्यासाठी मराठवाड्यातील परांडा (जि.धाराशिव ) डोमगावचा नैसर्गिकरित्या तयार झालेला ज्वारीचा हुरडा ठेवण्यात आला होता.
या हुरड्याशिवाय नैसर्गिकरित्या तयार झालेले डहाणू येथील चिकू देखील ठेवण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील चवदार जाम देखील ठेवण्यात आले होते. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठाकपुर्ली येथील बर्फी देखील पंतप्रधानांसाठी जेवणावळीत ठेवण्यात आली होती. या बर्फीमध्ये कुठल्याही प्रकारचा कृत्रिम रंग वापरण्यात येत नाही. महाराष्ट्राच्या या अस्सल मराठी पदार्थांचा आनंद पंतप्रधानांसह त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने देखील घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.