

Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज नावाचा कार्यक्रम मध्य प्रदेशातील इंदूर इथं पार पडला. या कार्यक्रमात पुण्यातील कार्यक्रमासारखाच जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी राहुल गांधींनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. या कार्यक्रमाला त्यांनी 'व्यवस्था विरुद्ध विद्यार्थी' असं नाव दिलं होतं.
कोटा, देहरादून आणि पुण्यात असाच राहुल गांधींचा 'छात्रों की गुंज' कार्यक्रम पार पडला आहे. यानंतर इंदूरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमालाही पहिल्या तीन कार्यक्रमांसारखाच विद्यार्थ्यांचा तुफान प्रतिसाद लाभला. पण पुण्यातील कार्यक्रमाची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा सध्या इंदूरच्या कार्यक्रमाची देखील होत आहे. पुण्यातल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ तरुणींसाठीच आयोजित करण्यात आला होता. त्यामुळं व्यासपीठावरही तरुणींनी आपल्या समस्या मांडल्या. विशेष म्हणजे पुरुषसत्ताक पद्धती उखडून टाका असं आवाहन यावेळी राहुल गांधींनी उपस्थित तरुणींना केलं होतं.
यानंतर इंदूरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमातही राहुल गांधींनी विद्यार्थ्यांचा प्रश्न लावून धरताना केवळ सरकारी शाळा आणि हॉस्टेल्स नसल्यानं विद्यार्थ्यांना किती भीषण परिस्थितीला सामोरं जाव लागत आहे, हे काही व्हिडिओजच्या माध्यमातून सांगितलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं निर्माण होत असलेली आव्हानं, पेपर लीक, संस्थाचं अपयश, पायाभूत सुविधांची कमी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि खासगीकरणासारखे विषय यांचा समावेश होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन व्यवस्थेनं विद्यार्थ्यांची अवस्था कशी वाईट केली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं "विद्यार्थी अशा प्रकारे प्रश्न विचारतात म्हणून व्यवस्थेलाही आता धडकी भरायला लागली आहे" अशा शब्दांत राहुल गांधींनी आपली भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, काही उमेदवारांनी परीक्षेदरम्यान चुका केल्या, पण कुठेतरी त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. यावर विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त करत, "आम्ही व्यवस्थेपुढे हारलो आहोत" अशा भावना व्यक्त केल्या.
राहुल गांधी म्हणाले, "व्यवस्थेमधील काही लोक भ्रष्ट होतात. पैशासाठी ते प्रश्नपत्रिका फोडतात आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालतात. जर भ्रष्ट लोक परीक्षा व्यवस्थेचा भाग राहिले आणि परीक्षा व्यवस्थाच भ्रष्ट झाली, तर त्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागतील, असं सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या संदेशाची व्यासपीठावर झलक दाखवत पुनरुच्चार केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.