Kunal Kamra Update : भाजपच्या लोकांनाही एकनाथ शिंदे आवडत नाहीत! कुणाल कामराचं मोठं विधान, कारणही सांगितलं...

Deputy CM Eknath Shinde BJP Politics : कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये व्हिडीओ शुट केला होता, त्या स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली होती.
Kunal Kamra-Eknath Shinde
Kunal Kamra-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी गद्दार शब्द उच्चारल्याने स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात कामराला अटकही होऊ शकते. त्यामुळे सध्या तो महाराष्ट्राबाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यातच त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठं विधान केले आहे.

कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये व्हिडीओ शुट केला होता, त्या स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. त्यानंतर याप्रकरणाची तीव्रता अधिकच वाढत गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कामरावर कारवाई कारवाईचे संकेत दिले. मुंबई पोलिसांचाही त्याच्याशी संपर्क झाला आहे.

Kunal Kamra-Eknath Shinde
Mahrang Baloch : पाकिस्तानला घाम फोडणारी 32 वर्षांची वाघीण; लष्करालाही आणले जेरीस...

कामराने सोमवारी रात्री ट्विट करत माफी मागणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आज त्याने एनडीटीव्हीशी बोलताना भाजप आणि एकनाथ शिंदेंविषयी मोठं विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्याला जवळपास 300 कॉल आले. त्यामध्ये मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. माझे तुकडे करण्याची धमकी दिली.

मला आलेले सर्व कॉल्स फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे होते. भाजप कार्यकर्त्यांचा एकही कॉल आला नाही. मला वाटते, भाजपच्या सदस्यांनाही एकनाथ शिंदे आवडत नाहीत, असे कामराने म्हटल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. त्याआधीत कामराने आज पुन्हा एक व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे. हम होंगे कामयाब या गाण्याच्या चालीवर त्याने हम होंगे कंगाल... या गाण्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

Kunal Kamra-Eknath Shinde
Kunal Kamra Latest Video : हम होंगे कंगाल..! कुणाल कामराने पुन्हा शिवसेनेला ललकारलं; नवीन गाण्याचा व्हिडीओ पोस्ट

कामराने याप्रकरणात माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे बोलले तेच मी बोलल्याचेही म्हटले आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कामराला समन्स बजावले आहे. कामराने पोलिसांकडे आठ दिवसांचा वेळ मागितला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com