Sarpanch : ऐकावं तर नवलचं : गावकऱ्यांचे असेही प्रेम ; नवनियुक्त सरपंचासाठी ११ लाखाचा हार !

Sarpanch : या हाराची लांबी मोठी असल्याने तो परिधान करण्यासाठी सरपंच आसा मोहम्द यांना आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर उभे राहावे लागले
Haryana panchayat election 2022 News update
Haryana panchayat election 2022 News updatesarkarnama
Published on
Updated on

Sarpanch : ग्रामपंचायत निवडणुकीचा एक फोटो सध्या समाजमाध्यमांवर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. तो फोटो आहे फतेहपुर (हरियाणा) येथील नवनिर्वाचित सरपंचाचा. सरपंच म्हणून निवडून आल्यावर गावकऱ्यांची त्यांना मोठी भेट दिली. (Haryana panchayat election 2022 News update)

पाचशे रुपयांच्या नोटा असलेला एकूण ११ लाख रुपयांचा हार गावकऱ्यांनी आपल्या नव्या सरपंचाच्या गळ्यात घातला, त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. आस मोहम्मद असे या सरपंचाचे नाव आहे. गावकऱ्यांनी त्यांना परिधान केलेल्या या ११ लाखांच्या हाराची सध्या जोरदार चर्चा आहे.

Haryana panchayat election 2022 News update
Sanjay Raut : महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे भाजपचं कारस्थान ; राऊतांचा हल्लाबोल

या हाराची लांबी मोठी असल्याने तो परिधान करण्यासाठी सरपंच आसा मोहम्द यांना आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर उभे राहावे लागले, त्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांना हा ११ लाखांचा हार घातला.

Haryana panchayat election 2022 News update
Abdul Sattar : गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ फिरवणारे सत्तार नाराज ? ; सत्तार म्हणाले..

पहिल्या मजल्यावर ११ लाखांचा हार परिधान केलेले सरपंच गावकऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानत असल्याचा व्हिडिओ माध्यमावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत फुलांचा हार घातल्याचे आपण पाहिले असेल पण या ११ लाखांच्या हारामुळे हे गाव चर्चेत आले आहे.

हरियाणामध्ये सध्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरु आहे.शनिवारी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. त्यात आसा मोहम्मद यांची सरपंच म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.त्यानंतर काही वेळाने त्यांना हा ११ लाखांचा हार परिधान करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com