Dhananjay Chandrachud : वादग्रस्त न्यायाधीशांबाबत धनंजय चंद्रचूड यांचा मोठा खुलासा; नियुक्तीला केला होता विरोध...

Shekhar Yadav Supreme Court Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्ययालयातील न्यायाधीश शेखर यादव यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे.  
Dhananjay Chandrachud
Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अलाहाबाद हायकोर्टातील न्यायाधीश शेखर कुमार यादव यांच्या एका विधानावरून ते वादात अडकले आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्टाचे निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही मोठा खुलासा केला आहे. न्यायाधीशपदी शेखर यादव यांची नियुक्ती करण्यास आपला विरोध होता, अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली आहे.

निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ‘लाइव्ह लॉ’ला दिलेल्या मुलाखतीत या वादावर भाष्य केले आहे. यादव यांच्या नियुक्तीबाबत चंद्रचूड यांनी तत्कालीन सरन्यायाधीशांना पत्र लिहून विरोध केला होता. त्यामध्ये त्यांनी नियुक्तीला विरोध करण्यामागची कारणेही लिहिली होती.

Dhananjay Chandrachud
MLA Vs Mayor : महिला आमदारांनी हात जोडले, पण महापौरांनी जुमानले नाही अन् बुलडोझर चालवला! घटनेचा Video व्हायरल...

चंद्रचूड यांनी मुलाखतीत सांगितले की, तत्कालीन सीजेआय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमला पत्र लिहिले होते. त्यामध्ये शेखर कुमार यादव यांची अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यास विरोध केला होता. यादव यांच्याप्रमाणे इतर काही नावांचाही विरोध केला होता. याचे कारण नेपोटिझम, संबंध आणि इतर पूर्वग्रहांशी संबंधित होते.

एखाद्या न्यायाधीशाचे इतर कोणी नातेवाईक असणे हे त्यांच्या अयोग्यतेचे कारण असू शकत नाही. पण नियुक्ती योग्यतेच्या आधारावर व्हायला हवे, असेही चंद्रचूड यांनी ‘नेपोटिझम’वर बोलताना स्पष्ट केले. न्यायाधीशांनी विचारपूर्वक बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Dhananjay Chandrachud
Priyanka Gandhi : भाजप खासदारांनी प्रियांका गांधींना दिले खास ‘गिफ्ट’; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण...

शेखर यादव यांच्या विधानावर बोलताना चंद्रचूड म्हणाले, विद्यमान न्यायाधीशांनी नेहमी लक्षात ठेवायला हवे की, ते काय बोलत आहेत? न्यायालयात असो की न्यायालयाबाहेर. न्यायपालिका पक्षपाती आहे, असा संदेश न्यायाधीशांच्या विधानांमधून जाता कामा नये.  

काय म्हणाले होते शेखर कुमार यादव?

शेखर कुमार यादव यांनी म्हटले होते की, हा देश बहुसंख्यांकांचा आहे. त्यांच्या इच्छेनुसारच हा देश चालले. हा कायदा आहे. एक न्यायाधीश म्हणून मी हे बोलत नाही. पण हे जे कठमुल्ला आहेत, हे शब्द योग्य नाही. पण बोलण्यात काहीच अडचण नाही, कारण ते देशासाठी वाईट आहेत. देशासाठी घातक आहेत. जनतेला भडकवणार लोक आहेत. त्यांच्यापासून सावध राहायला हवे, असे विधान न्यायाधीश यादव यांनी केले होते. कठमुल्ला म्हणजे कट्टर मौलवी किंवा धर्मांध असा अर्थ होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com