Pooja Khedkar : पूजा खेडकर यांनी आता टोक गाठलं; कोर्टात UPSC लाच ठरवलं खोटारडं

UPSC Delhi High Court Delhi Police : पूजा खेडकर यांनी नावात बदल करून फसवणूक केल्याचा आरोपी यूपीएससीने केला आहे. या तक्रारीवरून त्यांच्यावरही गुन्हाही दाखल झाला आहे.  
Pooja Khedkar, UPSC
Pooja Khedkar, UPSCSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खेडकर यांनी UPSC खोटं बोलत असल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. आपली निवड रद्द करण्याचे कोणतेही अधिकारी आयोगाकडे नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

यूपीएससीने खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. कोर्टात पूजा यांनी आपले उत्तर सादर केले आहे. परविक्षाधीन अधिकारी म्हणून निवड आणि नियुक्ती केल्यानंतर निवड अयोग्य घोषित करण्याचे यूपीएससीचे अधिकार संपुष्टात येतात, असा मोठा दावा खेडकर यांनी केला आहे.

Pooja Khedkar, UPSC
Railway Board : राहुल गांधींचा धसका की सरकारची रणनीती? रेल्वे बोर्डात पहिल्यांदाच दलित अध्यक्ष

खेडकर यांनी आपण नावात बदल केला नसल्याच दावा करताना म्हटले आहे की, 2012 ते 2022 या कालावधीत आपण नावात कोणताही बदल केलेला नाही. तसेच यूपीएससीलाही चुकीची माहिती दिलेली नाही. आयोगाने बायोमेट्रिक डेटाच्या माध्यमातून माझी माहिती पडताळली. त्यामध्ये माझी कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले नाही.

माझे शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मतिथी आणि वैयक्तिक माहिती तसेच इतर माहितीही सुसंगत आहे. यूपीएससीने 2019, 2021 आणि 2022 मध्ये पर्सनलिटी टेस्टदरम्यान एकत्रित केलेल्या बायोमेट्रिक डेटाच्या माध्यमातून माझी ओळख पटवली आहे. त्यानंतर 26 मे 2022 मध्येही आयोगाने कागदपत्रांवर शिक्कामोर्तब केले होते, अशी माहिती खेडकर यांनी कोर्टात दिली आहे.

Pooja Khedkar, UPSC
NDA Government : राज्यसभेत मोदी सरकारची बल्लेबल्ले; ‘या’ महत्वाच्या विधेयकांचा मार्ग मोकळा  

मी माझे नाव आणि प्रमाणपत्रांमधील विसंगती दूर करण्यासाठी तसे हमीपत्र आणि अधिकृत राजपत्रही सादर केले होते. पीडब्ल्यूबीडी, जात आणि वडिलांच्या नावाबाबत यूपीएससीच्या निर्देशांचे पालन केले. त्यामुळे मी माझे नाव चुकीचे सांगितल्याचे आयोगाचे म्हणणे चुकीचे असल्याचे खेडकर यांनी म्हटले आहे.  दरम्यान, हायकोर्टात खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com