Maharashtra Exit Poll 2024 : फुटीरांना महाराष्ट्रात धोबीपछाड; एक्झिट पोलचे धक्कादायक अंदाज

Exit Poll 2024 Maharashtra BJP Shiv Sena NCP Congress : महाराष्ट्रात महायुतीला जबर धक्का बसेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते.
Exit Poll
Exit PollSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने फुटीरांना महाराष्ट्रातील मतदारांनी नाकारले असल्याचेही या पोलमध्ये दिसते. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटका बसेल, असा अंदाज आहे.

महायुतीने राज्यात ४५ प्लसचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात युतीच्या निम्म्या जागाही येताना दिसत नाही. एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला केवळ २२ ते २६ जागा तर महाविकास आघाडीला २३ ते २४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना महायुतीत घेतले. शिंदेंसह अजित पवारांच्या पाठिशी भाजपची संपूर्ण ताकद उभी राहील, असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात तिन्ही पक्षांना फटका बसणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसते.

एक्झिट पोलनुसार, एकनाथ शिंदेंना केवळ सहा तर अजित पवारांना एकाच जागेवर समाधान मानावे लागेल. त्याचवेळी उध्दव ठाकरे यांची शिवसेना राज्यात भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणार पक्ष ठरू शकतो. ठाकरेंना ९ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

Exit Poll
Exit Poll Lok Sabha Election 2024 : सोलापुरात भाजपच्या हॅट्‌ट्रीकचे स्वप्न भंगणार; प्रणिती शिंदे आघाडीवर, सातपुते पिछाडीवर

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सहा जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार असल्याचे स्पष्टपणे दिसते. दुसरीकडे फुटीर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना मतदारांनी ठेंगा दाखवला आहे.

एबीपी-सी वोटर एक्झिट पोल

महायुती  - २२ ते २६

महाविकास आघाडी – २३ ते २४

इतर – १

Exit Poll
Maharashtra Exit Poll 2024 : फुटीरांना महाराष्ट्रात धोबीपछाड; एक्झिट पोलचे धक्कादायक अंदाज

भाजप - १७

काँग्रेस - ८

शिवसेना उद्धव ठाकरे – ९

शिवसेना एकनाथ शिंदे – ६

राष्ट्रवादी शरद पवार - ६

राष्ट्रवादी अजित पवार – १

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com